घरमहाराष्ट्रहिंजवडीत दारूसाठी पोलिसाची दादागिरी; घटना सीसीटीव्हीत कैद

हिंजवडीत दारूसाठी पोलिसाची दादागिरी; घटना सीसीटीव्हीत कैद

Subscribe

पोलीस कर्मचाऱ्याला दारू न दिल्याच्या रागात पोलिसाने हिंजवडीतील एका हॉटेलात राडा घातल्याची घटना घडली आहे.

दारू न दिल्याच्या रागातून पुण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने हिंजवडीमधील हॉटेलमध्ये राडा घातल्याचे समोर आले आहे. हॉटेल मालकाला मारहाण करत दमदाटी केल्याचं फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी रामकीसन रमेश खैरनार (वय-३२) यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस कर्मचारी अक्षय धुमाळसह अजय खोत व इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘कोल्हापुरात बचाव कार्यासाठी गेलेले विमान परत आले’; पुणे विभागीय आयुक्तांची माहिती

हॉटेल परिसरातील दुकानांचे नुकसान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या हॉटेलमध्ये असताना आरोपी पोलीस कर्मचारी अक्षय धुमाळ हा त्याच्या इतर चार मित्रांसह तेथे मध्यरात्री आला. ”आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणसाला त्या दिवशी दारू का दिली नाहीस?” असे म्हणत त्या पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. यावेळी हॉटेलच्या बाजूला असणाऱ्या चायनीज दुकानाचेही त्याने नुकसान केले आहे. यात दुकानांच्या काचा फुटल्या असून खूप नुकसान झाले आहे. घटनेप्रकरणी अद्याप आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. मात्र एका अश्या पोलीस कर्मचाऱ्यामुळे सर्व पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदनामी होत आहे हे मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -