घरमहाराष्ट्र'कोल्हापुरात बचाव कार्यासाठी गेलेले विमान परत आले'; पुणे विभागीय आयुक्तांची माहिती

‘कोल्हापुरात बचाव कार्यासाठी गेलेले विमान परत आले’; पुणे विभागीय आयुक्तांची माहिती

Subscribe

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शासन करत आहे. पुण्यात आतापर्यंत १३ हजार ३३६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, सर्वत्र पाणी साचल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत असल्ची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. बुधवारी दुपारी म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागातील पूर परिस्थिती आणि बचाव कार्यबाबत माहिती दिली. कोल्हापुरात पाणी साचल्यामुले विमान लँण्ड होऊ शकल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

विभागीय आयुक्तांनी पूर परिस्थितीबाबत दिली माहिती

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी दुपारी यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली. यामध्ये त्यांनी पूर परिस्थितीबाबत माहिती दिली. दीपक म्हैसेकर म्हणाले की, ‘कोल्हापूरमध्ये आमच्या काही अडचणी होत्या. कारण कोल्हापुरातील रस्त्यांमध्ये कनेक्टीव्हिटी नव्हती. काल रात्री बचावकार्यासाठी कोल्हापुरात गेलेले विमान लँण्ड होऊ शकले नाही. त्यामुळे विमानाला परत यावे लागले. आज सकाळी आम्ही त्या भागात एअर कनेक्टिव्हीटी निर्माण करण्यात यशस्वी झालो. आम्ही तिथे मदतकार्याची सुरुवात केली आहे. आज संध्याकाळ पर्यंत एनडीआरएफचे सहा विमान आणि नौदलाचे पथक कोल्हापूरला बचावकार्यासाठी रवाना होतील. एनडीआरएफची काही पथके आम्ही कराडहून रस्ते मार्गाने सांगवीला पाठवले आहेत. हे पथके आता पोहचण्यातच असतील.’

- Advertisement -

हेही वाचा – कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प

‘याव्यतिरिक्त टेरिटोरियल आर्मीची पथके तिथे आहेत. याशिवाय गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर एनडीआरएफची अतिरिक्त पथके उपलब्ध आहेत. ते तिकडे पाठवण्यात येथील. आज सकाळी एक पथक औरंगाबाद येथून आले. ते पथक आम्ही सांगवीच्या दिशेला रवाना केले. एकंदर परिस्थितीच्या बाबतीत आम्ही कायम त्याकडे लक्ष देऊन आहोत. लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही तिनही जिल्हाधिकारी आणि कर्नाटकातल्या आमच्या अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात आहोत’, असे दीपक म्हैसेकर म्हणाले. ‘राज्य शासनाची सर्व बाबतीत आम्हाला मदत मिळाली आहे. आरोग्य सेवेच्या बाबतीत सर्व औषधांची उपलब्धता आपल्याकडे आहेत. काही औषधे आणायचे असतील तर ती देखील व्यवस्था आमच्याकडे आहे. परंतु, सध्या तशी काही गरज नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. १७ नगरपालिका बाधित झाल्या आहेत. २ महानगरपालिका बाधित झाल्या आहेत. याव्यतिरिक्त ज्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बाधित झाली आहे. तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ओटी टेस्ट करुन किंवा प्रॉपर क्लोरिन टेस्ट करुन त्यांना पिण्याचे पाणी आम्ही पुरवत आहोत’, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगलीत अतिवृष्टी

पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागात अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर, सांगली आणि साताऱ्यात अजूनही प्रचंड पाऊस पडत आहे. येत्या तीन दिवसांत कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील ५८ तालुक्यांपैकी ३० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागात आतापर्यंत १३७ टक्के पाण्याची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सांगलीतही नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. साताऱ्याच्या कराड परिसरात पूर ओसरेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, आता पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात सखल भागात पाणी साचले होते. मात्र, राधानगरी धरणाचे दरवाजे सोडल्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सांगलीतही महापूर आला आहे. पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की काही ठिकाणी बंगले देखील पाण्यात गेले आहेत. मनपा आयुक्तांचे निवासस्थान पाण्यात बुडाले आहे. नागरिक आणि मुक्या जनावरांचे मोठे हाल होत आहेत. नागरिकांना रेस्क्यू द्वारे बाहेर सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात येत आहे. घरांबरोबर शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुण्यात १३ हजार ३३६ नागरिकांचे स्थलांतर

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शासन करत आहे. पुण्यात आतापर्यंत १३ हजार ३३६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली. साताऱ्यातही शासनाने ६ हजार २०० लोकांचे पुनर्वसन केले आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफचे जवान तिन्ही जिल्ह्यांमध्ये दाखल झाले आहेत. नागरिकांना रेस्क्यूद्वारे बाहेर सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात येत आहे.


हेही वाचा – पुणे : मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्‍ज – आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -