घरमहाराष्ट्रपालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवकावर गुन्हा दाखल

पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवकावर गुन्हा दाखल

Subscribe

पिंपरी-चिंचवड येथे पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि पालिका अधिकारी यांना मारहाण केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल कलाटे यांच्यासह विनोद मोरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पालिका अधिकारी अनिल महादेव राऊत यांनी फिर्याद दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शिवसेना गटनेते यांचे सहकारी विनोद मोरे यांनी फोन वरून पालिका अधिकारी अनिल महादेव राऊत यांना टीडीआरवर सही न केल्याने जाब विचारत अश्लील शिवीगाळ केली. तसेच राहुल कलाटे यांनी देखील दमदाटी केली. त्यानंतर सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास राहुल कलाटे यांनी अभियंता सतीश इंगळे यांच्या कार्यालयात जाऊन फिर्यादी अनिल महादेव राऊत यांना खुर्चीने मारहाण केली. तसेच अंगावर धावून जात गचांडी धरली. अर्वाच्य भाषेत पुन्हा शिवीगाळ करत दमदाटी केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सगळं खोटं आहे,त्या अधिकाऱ्याने फोन का घेतला नाही? अशी विचारणा केली. शिवीगाळ किंवा मारहाण केलेली नाही. हे सर्व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं षडयंत्र आहे. त्यांचा मी संभाव्य प्रतिस्पर्धी आहे. म्हणून त्यांनी हे कुभांड रचले आहे.
– राहुल कलाटे, शिवसेना गटनेते
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -