घरमहाराष्ट्रआजाराच्या नैराश्यातून पोलीस हवालदाराची आत्महत्या

आजाराच्या नैराश्यातून पोलीस हवालदाराची आत्महत्या

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस हवालदार चंद्रकांत टिळेकर यांनी कॅंनर आजाराच्या निराशेतून आत्महत्या केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथे पोलीस हवालदाराने आजाराच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. चंद्रकांत टिळेकर असं आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते निगडी पोलीस ठाण्यात कार्यकरत होते. दरम्यान त्यांना चिखली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले होते.

नेमकं काय घडलं ?

बुधवारी दुपारी एकच्या सुमारास चंद्रकांत टिळेकर यांनी आपल्या राहत्या घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पाठीमागे पत्नी एक मुलगा आणि मुलगी आहे. बुधवारी दुपारी पत्नी घराबाहेर जात असताना चंद्रकांत टिळेकर यांनी पत्नीला दरवाजाची बाहेररून कडी लावण्यास सांगितली होते. मुले शाळा आणि महाविद्यालयातून आल्यानंतर कडी उघडतील अस ते म्हणाले. परंतु पत्नी एक तासाने घरी परत आल्यानंतर चंद्रकांत टिळेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांना एक मुलगी आणि मुलगा असून मुलगा इयत्ता ९ वी शिक्षण घेत आहे, तर मुलगी महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहे. टिळेकर हे निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.परंतु त्यांना चिखली पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले मात्र ते तोंडाच्या कँसर या आजाराने ग्रस्त असल्याने हजर राहू शकले नाहीत. आजाराच्या नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या तीन महिण्यापासून ते वैद्यकीय रजेवर होते. या घटनेमुळे टिळेकर कुटुंबात दुःखाचे वातावरण आहे.घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – विनोद तावडेंनी सर्व शिक्षा अभियानाचा खेळ खंडोबा केला – अजित पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -