घरमहाराष्ट्रपोलिसांना 2024 मध्ये सगळ्या खोट्या गुन्ह्यांचा जबाब द्यावा लागेल; रश्मी शुक्लांचा संदर्भ...

पोलिसांना 2024 मध्ये सगळ्या खोट्या गुन्ह्यांचा जबाब द्यावा लागेल; रश्मी शुक्लांचा संदर्भ देत राऊतांचा इशारा

Subscribe

मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्वीट करत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्तीबद्दल अभिनंदन करणारे ट्वीट केले होते, मात्र थोड्याच वेळात त्यांनी हे ट्वीट डीलीट केले. त्यामुळे रश्मी शुक्ला यांची महासंचालकपदी नियुक्ती होणार का? अशी चर्चा असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी माध्यामांना सांगितले आहे. (Police will have to answer for all fake crimes in 2024 Sanjay Rauts warning referring to Rashmi Shukla)

हेही वाचा – शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी; संजय राऊतांनी केली टिप्पणी…

- Advertisement -

ईडीला राऊत कुटुंबांची धास्ती वाटते आहे का? आधी तुम्हाला अटक झाली आणि आता तुमच्या भावाला चौकशीसाठी बोलवलं आहे? या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही अशा नोटीसींना घाबरत नाही. कुणीतरी ऐरे गैरे, महिलांचे शोषण करणाऱ्यांच्या दबावाखाली महाराष्ट्राचे पोलीस गुन्हे दाखल करतात. ज्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत, अशा गुन्हेगाराला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी तुम्ही नेमता? मी त्यातला पीडित आहे. माझा फोन टॅप केला होता. अशा पोलिसांच्या हाती तपास असेल तर तुम्ही यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता? मी कोर्टात जातोय. कारण माझं कुणाशी वैयक्तिक भांडण नाही. पण माझं पोलिसांना आव्हान आहे की, 2024 साली तुम्हाला या सगळ्या खोट्या गुन्ह्यांचा जबाब द्यावा लागेल, अशा शब्दांत संजय राऊत यांनी रश्मी शुक्ला प्रकरणी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

हेही वाचा – आमच्यावर गुन्हे दाखल करणारे त्यावेळेला घरामध्ये…; कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी राऊतांचा संताप

- Advertisement -

एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यमाच्या रेड्यावर स्वार 

दिल्लीत नक्षलवाद्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले असून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. या दौऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाव नक्षलवादाचं आहे, पण कारणं वेगळी आहेत. महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या हल्ल्याशिवाय गेल्या चार दिवसांत 100 हून जास्त लोक मरण पावले आहेत. हा गंभीर विषय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ करत नसेल, तर मला वाटतं त्यांचं मन व हृदय मेलेलं आहे. दिल्लीवाल्यांची मन की बात ते ऐकायला येतात. पण नांदेड, छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत जे मृत्यूचं तांडव सुरू आहे, त्यांचा आक्रोश त्यांना ऐकायला जात नाही. महाराष्ट्रात एक यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -