घरमहाराष्ट्रअनेकदा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात

अनेकदा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात

Subscribe

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एक महत्त्वाचे विधान करत या प्रकरणाला पुन्हा एकदा हवा दिली आहे. ‘अनेक वेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. तसं त्यांनी करू नये, अशी आमची अपेक्षा आहे’, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी पाच वर्षे गृहमंत्रीपद सांभाळले होते. त्यांनी पोलीस कारभार जवळून पाहिला असून पोलिसांवरील राजकीय दडपण हा काही नवीन विषय नाही. मात्र, आताच तो उपस्थित करून फडणवीस सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण तापवू पाहत आहेत का, असा सवाल विचारला जात आहे.

शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना सुशांत सिंह राजपूत प्रकरणी भाजपची भूमिका मांडताना त्यांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याची कसरत केली. एकीकडे त्यांनी पोलिसांवर विश्वास देखील व्यक्त केला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांनी पोलिसांवर राजकीय दडपण असल्याचे म्हटले आहे.‘या प्रकरणात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, त्यातून जनभावना तयार झाली की याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. म्हणूनच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. पण मी महाराष्ट्र पोलिसांसोबत ५ वर्ष काम केलं आहे. त्यांची क्षमता मला पूर्णपणे माहिती आहे. महाराष्ट्राचे पोलीस उत्तम काम करतायत, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे’, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘संजय राऊत तशा अनेक गोष्टी बोलत असतात. पण ते बोलत असलेल्या सगळ्याच गोष्टी खर्‍या थोड्याच असतात’! तसेच पवार कुटुंबातील वादावर ते म्हणतात, ‘पवार कुटुंबीयांमध्ये सध्या सुरू असलेला वाद हा त्यांच्या अंतर्गत कौटुंबिक प्रश्न आहे. त्यात आम्हाला पडायचं नाही. त्याच्याशी आमचा संबंध नाही. तो प्रश्न त्यांनीच सोडवायचा आहे’.

‘बदल्यांबाबत जे ऐकतोय, ते भयानक आहे!’
राज्यातल्या सत्ताधारी पक्षात अंतर्गत भांडणं सुरू असल्याचा दावा यावेळी फडणवीसांनी केला.‘महाविकासआघाडीच्या कारभाराबाबत बोलण्याची ही वेळ नाही. त्यांनी सरकार नीट चालवावं. आता त्यांच्यात अंतर्गतच इतकी भांडणं सुरू आहेत, की त्यामुळे सरकारमध्ये नक्की काय चाललंय हे कुणालाच कळत नाही. बदल्यांच्या बाबतीत जे चाललंय, ते अनाकलनीय आहे आणि त्याबाबत जे ऐकायला येतंय ते याहून भयानक आहे. मी पेपरमध्ये वाचलं की राज्याच्या डीजींनी असं म्हटलंय की मला चुकीच्या बदल्या (Transfer) करायला सांगितल्या, तर मी त्या करणार नाही, गरज पडली तर मी सोडून देईन. अशा प्रकारची स्थिती असेल, तर ते गंभीर आहे. कोविडच्या काळात बदल्या केल्या नसत्या, तरी चाललं असतं. पण १५ टक्के बदल्यांना मुभा दिली. बदल्यांसाठीही पैसा लागतो’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -