घरमहाराष्ट्रPolitics: साध्या आमदाराला धमकी देणं शरद पवारांना शोभत नाही; फडणवीसांची प्रतिक्रिया

Politics: साध्या आमदाराला धमकी देणं शरद पवारांना शोभत नाही; फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जवळपास 55 वर्षे राजकारणात पूर्ण केली आहेत. त्यामुळे या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी देणं योग्य वाटत नाही.

मुंबई: शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जवळपास 55 वर्षे राजकारणात पूर्ण केली आहेत. त्यामुळे या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी देणं योग्य वाटत नाही. त्यांनी याचा पुनर्विचार करावा, त्यांना सांगणारा मी कोणी मोठा नाही. परंतु त्यांनी यावर विचार करावा, असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी अजित पवार गटाच्या आमदाराविरोधात केलेल्या वक्तव्यावर दिली आहे. (Politics It does not suit Sharad Pawar to threaten an ordinary MLA Sunil Shelke Devendra Fadnavis reaction)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जवळपास 55 वर्षे राजकारणात घालवली आहेत. त्यांचा स्तर हा एक वेगळा आहे. असं असताना त्यांनी एका साध्या आमदाराला धमकी देणं मला अजिबात योग्य वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

शरद पवारांची धमकी काय?

लोळावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र या मेळाव्यात कार्यकर्ते उपस्थित राहू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी धमकावत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

“मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. त्यावेळी पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होतं? फॉर्म भरताना पक्षाचं चिन्ह आणि नेत्याची सही लागते, ती सही माझी सही आहे. माझ्या सहीवर तुम्ही निवडून आलात आणि त्याच पक्षाच्या, त्या विचाराची लोक राबवली, घाम गाळला त्यांना तुम्ही दमदाटी देता. हे लक्षात ठेवा. माझी विनंती आहे एकदा दमदाटी दिली ठीक आहे. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने कधी जात नाही, पण या वाटेने मला जाण्याची सुरूवात कोणी केली तरी ती तुम्ही केली. पण माझ्या वाटेला कोणी गेलं तर मी कोणाला सोडत नाही, अशा शब्दात पवार यांनी नाव न घेता सुनील शेळकेंना इशारा दिला.

- Advertisement -

रामदास कदमांना अशी सवयच आहे

रामदास कदम यांच्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, रामदास कदम यांना मी खूप वर्षांपासून ओळखतो. त्यांना असं बोलण्याची सवय आहे. ते अनेकदा टोकाची भूमिका घेऊन बोलतात. भाजपाने शिवसेनेचा कायमच सन्मान केला आहे. आम्ही आजही भक्कमपणे मुख्यमंत्री शिंदेंच्या मागे उभे आहोत. राष्ट्रवादी, शिवसेना, तसंच आमचे इतर मित्रपक्षांना आम्ही सोबतच घेऊनच पुढे जाणार आहोत, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

(हेही वाचा: NCP vs NCP : सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले – “अजित पवारांना खलनायक बनवू नका”)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -