घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis threat case : योगेश सावंतला वांद्रे कोर्टाकडून जामीन मंजूर

Devendra Fadnavis threat case : योगेश सावंतला वांद्रे कोर्टाकडून जामीन मंजूर

Subscribe

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जीवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना वांद्रे महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज (7 मार्च) जामीन मंजूर केला. योगेश सावंत यांच्यांसह या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवले यांना न्यायाधीश अतुल जाधव यांनी प्रत्येकी 15हजार रुपयांच्या रोखीच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला. योगेश सावंत हे 29 फेब्रुवारीपासून अटकेत होते. (Devendra Fadnavis threat case Yogesh Sawant granted bail by bandra court)

हेही वाचा –Shivsena MLA Disqualification: नार्वेकरांच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; मूळ रेकॉर्ड्स मागवले

- Advertisement -

योगेश सावंत यांनी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जीवे ठार मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर युवासेनेचे अक्षय पनवेलकर यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी योगेश सावंत यांनी 29 फेब्रुवारी रोजी अटक केली आणि वांद्रे न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने योगेश सावंत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच याप्रकरणी किंचक नवलेला पोलिसांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने २ मार्च रोजी सातारा येथील सदर बाझार येथून अटक केली.

किंचक नवलेला वांद्रे कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. याचवेळी पोलिसांनी न्यायालयाला योगेश सावंत याची अधिक चौकशी करायची असल्याचे सांगितले आणि मुंबई सेशन्स न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज केला होता. त्यामुळे योगेश सावंत यांनाही न्यायालयाने 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, सेशन्स कोर्टाच्या या आदेशाला योगेश सावंत यांनी पत्नीमार्फत तातडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने याप्रकरणी तातडीची सुनावणी घेत सेशन्स न्यायालयाचा आदेश अवैध ठरवून रद्दबातल केला. तसेच योगेश सावंत यांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत केली.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : बाळासाहेब नसते तर मोदी कुठे असते; उद्धव ठाकरेंनी सांगितला 2002 चा किस्सा

योगेश सावंत यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीच दिली नसल्याने नैसर्गिक न्यायतत्त्वाचा भंग झाला आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आदेशात नोंदवले होते. यापार्श्वभूमीवर आज योगेश सावंत आणि किंचक नवले या दोघांच्या जामीन अर्जांवर वांद्रे न्यायालयात सुनावणी पार पडली. योगेश सावंत यांची बाजू अॅड. प्रशांत अहेर यांनी तर किंचक नवले यांची बाजू अॅड. सतीश मानेशिंदे यांनी मांडली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवलेली निरीक्षणे आणि दोन्ही आरोपींना आणखी कोठडीची आवश्यकता नसल्याचे लक्षात घेऊन वांद्रे न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -