घरमहाराष्ट्रदेशात जूननंतर आर्थिक मंदीची शक्यता - नारायण राणे

देशात जूननंतर आर्थिक मंदीची शक्यता – नारायण राणे

Subscribe

केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी पुण्यात जी-२० परिषदेचे उद्घाटन झाले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी जूननंतर देशात आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली आहे. सोबतच आर्थिक मंदीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी पुण्यात जी-२० परिषदेचे उद्घाटन झाले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी जूननंतर देशात आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली आहे. सोबतच आर्थिक मंदीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. देशात उद्योग वाढवले तर रोजगार वाढतील. रोजगार वाढल्यास देशाचा जीडीपीदेखील वाढेल. आपल्याला नफा मिळवून देणारे तंत्रज्ञान हवेत, असे नारायण राणे म्हणाले.

यावेळी नारायण राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जी-२० परिषद देशातील विविध शहरांमध्ये होत आहे. ही आंतरराष्ट्रीय संस्था असून या परिषदेचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला हे माझे सौभाग्य आहे. भारत एक प्रगतशील देश असून २०१४ मध्ये भारत जगात दहाव्या क्रमांकावर होता. आता अमेरिका, चीन, जपान, जर्मनी यानंतर आपली पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. त्यामुळे आपण नक्कीच आर्थिक महासत्ता होऊ. आपल्याकडे ५० टक्के लोकसंख्या ही शहरात राहत असून त्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत या दृष्टीने परिषदेमध्ये चर्चा होणार आहे, अशी माहितीही राणेंनी यावेळी दिली. पुणे, मुंबई अशी शहरे गुंतवणुकीस आकर्षित करीत आहेत. भारत प्रगती करीत असून त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

सरकार बदलल्यास उद्योग जात नाहीत
सरकार बदलले म्हणून उद्योग बाहेर गेले असे होत नाही. मी ४ वर्षे उद्योगमंत्री होतो. ज्या राज्यांमध्ये उद्योगांना जास्त सवलती मिळतात तिथे उद्योग येतात. महाराष्ट्र विकसित राज्य असल्याने जमीन, पायाभूत सुविधांचा खर्च जास्त आहे. काही उद्योग तेवढ्यापुरते जातात आणि महाराष्ट्रात परत येतात, असे नारायण राणे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -