घरमहाराष्ट्रकोमसापच्या दोडामार्ग अध्यक्षपदी प्रभाकर धुरी

कोमसापच्या दोडामार्ग अध्यक्षपदी प्रभाकर धुरी

Subscribe

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दोडामार्ग-बांदा शाखेच्या पहिल्या कार्यकारिणीची निवड आज पार पडली. दोडामार्ग येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दोडामार्ग-बांदा शाखेच्या अध्यक्षपदी पत्रकार प्रभाकर अंकुश धुरी यांची, सचिवपदी प्रकाश तेंडोलकर यांची, उपाध्यक्षपदी निवेदिता नारकर यांची तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून उदय पास्ते यांची सर्वानुमते निवड झाली. जिल्हा कार्यकारिणीने दोडामार्ग-बांदा शाखेच्या पहिल्या कार्यकारिणीची निवड आज केली. दोडामार्ग येथील महाराजा हॉटेलच्या सभागृहात बैठक झाली.

नवीन कार्यकारिणी

अध्यक्ष-प्रभाकर धुरी, उपाध्यक्ष- निवेदिता नारकर, सचिव-प्रकाश तेंडोलकर, सहसचिव- शीतल गवस, कोषाध्यक्ष-चंद्रकांत सावंत, जिल्हा प्रतिनिधी-उदय पास्ते, कायदेशीर सल्लागार-अँड.सोनू गवस, सदस्य-अरुण पवार, दिवाकर गवस, संजय गवस, अनिल शेटकर,रामचंद्र शेटकर,मकरंद करमळकर, मनोज मालवणकर,गजानन भणगे.

- Advertisement -

निवडणूक अधिकारी तथा निरीक्षक म्हणून मंगेश मसके यांनी काम पाहिले. सुरूवातीला मान्यवरांचे स्वागत आणि परिचय करुन देण्यात आला. गावडे, पिंटो यांनी स्वतःचा परिचय करुन दिला आणि कोमसापबद्दल माहिती दिली. मसके यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना, उद्देश, कार्य याबाबत माहिती दिली. कोमसापचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रथितयश साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांचे योगदान आणि स्थापनेमागचे उद्देश सांगितले. तसेच तालुका कार्यकारिणीची आचारसंहिता, घटना आणि राबवावयाचे उपक्रम याबाबत माहिती दिली. कार्यकारिणी स्थापनेसाठी प्रयत्नशील राहून तसेच उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल कोमसापचे जिल्हा अध्यक्ष,सचिव, समन्वयक व सर्व सदस्यांचे तेंडोलकर यांनी आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -