घरताज्या घडामोडीशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारत रत्न द्या - डॉ प्रवीण तोगडिया

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारत रत्न द्या – डॉ प्रवीण तोगडिया

Subscribe

फायरब्रॅण्ड नेता म्हणून ओळख असणाऱ्या डॉ प्रवीण तोगडिया यांनी सोमवारी अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणातील योगदानासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न देण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ आणि रामनाथ परमहंस यांनाही भारत रत्न द्यावा अशी मागणी केली आहे. तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच बाबरी मस्जिदला हिंदूंकडून पाडण्यात आले होते. ६ डिसेंबर या दिवसाचा उल्लेख त्यांनी एतिहासिक दिवस म्हणून केला आहे. बाबरी मस्जिद पाडल्यानेच करोडो श्रद्धाळूंचे स्वप्न साकारल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राम मंदिर तर बनतच आहे. पण जेव्हा कोट्यावधी विस्थापित हिंदू आपल्या घरी जेव्हा परतणार तेव्हाच रामराज्य येऊ शकते, असेही ते म्हणाले. आजही १९ कोटी लोक भुकेल्या पोटी असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तोगडिया यांनी आपल्या सोबत आंदोलनामध्ये अनेक मुख्य नेत्यांचे योगदानही बोलून दाखवले. त्यामध्ये तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ आणि रामनाथ परमहंस यांचीही आठवण त्यांनी काढली. एक ऑन्कोलॉजिस्टच्या रूपात आपल्या सर्जरी कौशल्याने आणि संशोधन अभ्यास सोडल्याचाही गर्व असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. मला माझ्या प्रोफेशनमधून करोडो रूपये कमावता आले असते. पण मी त्यावेळी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

शिवसेना प्रमुख आणि अशोक सिंघल यांनी राम मंदिराच्या निर्माणामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच या दोघांनाही भारतरत्न द्यावा अशी मागणी त्यांनी केली. एका समुदायाला संबोधित करताना त्यांनी ही मागणी केली. महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अविद्यानाथ यांच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणीही त्यांनी केली.

याचवेळी त्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करताना प्राण गमावणाऱ्या ७०० शेतकऱ्यांच्या कुटूंबांना मोबदला देण्याचीही मागणी केली. शेतकऱ्यांना डावलत काही व्यापाऱ्यांना फायदा मिळवून देत असल्याचा आरोपही त्यांनी भाजप सरकारवर केला. त्यामुळेच या शेतकऱ्यांना मोबदला मिळाचा पाहिजे असेही ते म्हणाले.

- Advertisement -

मथुरा येथे भगवान कृष्णाच्या जन्मस्थळी आणि वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर ज्ञानवापी मस्जिदच्या मालकी हक्काच्या वादावर त्यांनी बोलताना सांगितले की, याबाबतचा आवश्यक असा कायदा करण्याची गरज आहे. कारण संसदेत भाजपकडे बहुमत आहे. त्यामुळेच भाजप याबाबतचा कायदा तयार करू शकते असेही ते म्हणाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -