घरदेश-विदेशToday Petrol Diesel Price : आज पेट्रोल झाले स्वस्त? जाणून घ्या तुमच्या...

Today Petrol Diesel Price : आज पेट्रोल झाले स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

Subscribe

सरकारी तेल कंपन्यांकडून आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आज देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत गेल्या महिन्याभरापासून कोणताही बदल झालेले नाही. मंगळवारी दिल्लीच्या बाजारात पेट्रोलचा दर हा ९१. ४१ रुपये लिटर इतका आहेत तर डिझेल ८६.६७ रुपये लिटर इतका झाला आहे.

पेट्रोल- डिझेलचे लेटेस्ट रेट (Petrol-Diesel Price on 7th December 2021)

दिल्लीत पेट्रोल आज प्रति लिटर ८५.४१ रुपये इतके आहे तर डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर १०९.९८ आणि डिझेल ९४.१४ रुपये आहे. तर कोलकत्तामध्ये पेट्रोल प्रति लिटर १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये आहे.

- Advertisement -

तर चेन्नईमध्ये प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १०१.४ आणि ९१.४३ रुपयांनी विकले जातेय. तर एनआरसीतील नोएडा शहरात पेट्रोलचा दर ९५.५१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.०१ रुपये प्रति लिटर इतके आहे.
याशिवाय उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोलचा दर ९५.२८ प्रति लिटर आणि डिझेल ८६.८० रुपये प्रति लिटर झालेय.

‘या’ ठिकाणी पाहू शकता पेट्रोल-डिझेलचे दर

इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर https://associates.indianoil.co.in/PumpLocator पेट्रोल डिझेलचे दर दररोज पाहता येऊ शकतात. दरम्यान एसएमएसद्वारेही तुम्हाला पेट्रोल- डिझेलच्या किंमतींची माहिती मिळवू शकते यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP स्पेस पेट्रोल पंपाचा कोड टाईप करुन 9224992249 या क्रमांकावर एस मेसेज पाठवावा लागतो. तर बीपीसीएलच्या ग्राहकांना RSP टाईप करुन 9223112222 क्रमांकावर पाठवायचा आहे. तर एचपीसीएलच्या ग्राहकांना HPPrice लिहून 9222201122 क्रमांकावर पाठवायचा आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -