घरमहाराष्ट्रमनोरुग्ण मुलाने केली आईची हत्या

मनोरुग्ण मुलाने केली आईची हत्या

Subscribe

पुण्याच्या चिंचवड येथे एका ४० वर्षीय मनोरुग्ण मुलाने आपल्याच आईची हत्या केली आहे. हत्या करुन हा मनोरुग्ण फरार झाला असून त्याचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.

चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनोरुग्ण मुलाने आईचा गळ्यावर कात्रीने वार करत खून केल्याची घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे या अगोदर देखील मुलाने आईच्या डोळ्या शेजारी सुरीने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, एकुलता एक मुलगा असल्याने पोलिसांकडे तक्रार केली नाही. सुमन सावंत (वय – ६०) असं खून झालेल्या आईचे नाव असून भुपेंद्र सावंत (वय – ४०) असं मनोरुग्ण आरोपी मुलाचे नाव आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोरुग्ण भुपेंद्र याने आज सकाळी आईच्या गळ्यावर कात्रीने वार करून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून त्याने घराच्या पाठीमागील दरवाजातून पळ काढला. सकाळ पासून दरवाजा का उघडला नाही? हे पाहण्यासाठी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर सुमन यांचा खून झाल्याचे उघड झाले. तात्काळ त्यांनी चिंचवड पोलिसांना याची माहिती दिली. आरोपी हा सुमन यांचा एकुलता एक मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी मयत सुमन यांच्या पतीचे निधन झाले. तसेच काही महिन्यांपूर्वी सुमन यांच्या डोळ्या शेजारी सुरी खुपसून खून करण्याचा प्रयत्न मनोरुग्ण मुलगा भुपेंद्रने केला होता. पोलिसांनी त्यांच्याकडे धाव देखील घेतली. परंतु, त्यांनी प्रेमापोटी मुलाची तक्रार पोलिसांत दिली नव्हती. भुपेंद्र हा फरार असून त्याचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -