घरमुंबईभिवंडीत निवडणूक ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

भिवंडीत निवडणूक ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Subscribe

भिवंडी शहरातील निजामपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

भिवंडीत लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरु असतानाच भिवंडीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील निजामपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. दशरथ कान्हु कोरडे (५७ रा. हरसोळे, ता. वाडा) असे ऑन ड्युटीवरील मृत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

दशरथ कोरडे ठाणे येथील मुख्य पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होते. मात्र सद्या त्यांची नेमणूक भिवंडीत लोकसभा निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी निजामपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. १० एप्रिल रोजी ते येथे रुजू झाले होते. काल सकाळी ते ड्युटीवररील पॉईंटवर जाण्यासाठी निघाले असता त्यांच्या छातीत कळ मारून आल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कळव्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर वाडा तालुक्यातील हरसोळे गावातील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी आणि दोन मुले,१ भाऊ ,२ बहिणी असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -