घरमहाराष्ट्रपरवीन सुलताना यांनी जागवल्या पंडित भीमसेन जोशींच्या आठवणी

परवीन सुलताना यांनी जागवल्या पंडित भीमसेन जोशींच्या आठवणी

Subscribe

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या सुश्राव्य सुरावटींनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. यावेळी बोलताना परवीन सुलतान यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या आठवणी जागवल्या.

मला मोठ्या भावासारखा जीव लावणारे, तानपुरा मिळवून देण्यापासून ते मदतीसाठी कायम पुढे होणारे, असे म्हणत बेगम परवीन सुलताना यांनी पं. भीमसेन जोशी यांचे स्मरण करत आठवणी सांगितल्या. पुण्यासारखा जाणकार श्रोता दुर्मिळच, असे म्हणत त्यांनी पुणेकर रसिकांचे कौतुक केले.

- Advertisement -

बेगम परवीन सुलताना यांनी आपल्या गायनाची सुरूवात राग ‘जोग’ने केली. त्यांनी सादर केलेल्या बडा ख्याल व छोटा ख्यालला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. त्यांना पं. मुकुंदराज देव (तबला), पं. श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम), विद्या जाईल, शादाब सुलताना खान आणि सचिन शेटे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. त्यांच्या आधी प्रसिद्ध शास्त्रीय गायक प्रसाद खापर्डे यांनी राग केदार सादर केला. त्यांनी सादर केलेल्या ‘राम भजो भाई’ या भजनालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), ह्रषिकेश शेलार, शिवाजी चामनर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -