घरमहाराष्ट्रमहापालिकेच्या सेवासुविधांची माहिती देणाऱ्या दैनंदिनीचे आयुक्तांकडून प्रकाशन

महापालिकेच्या सेवासुविधांची माहिती देणाऱ्या दैनंदिनीचे आयुक्तांकडून प्रकाशन

Subscribe

मुंबई महापालिका प्रशासन मुंबईकरांना स्थापनेपासून देत असलेल्या विविध सोयीसुविधांची सखोल माहिती असलेल्या 'नागरी दैनंदिनी २०२४' चे प्रकाशन महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या हस्ते मंगळवारी पालिका मुख्यालयात करण्यात आले.

मुंबई, दि.२७ डिसेंबर (प्रतिनिधी.) -: मुंबई महापालिका प्रशासन मुंबईकरांना स्थापनेपासून देत असलेल्या विविध सोयीसुविधांची सखोल माहिती असलेल्या ‘नागरी दैनंदिनी २०२४’ चे प्रकाशन महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या हस्ते मंगळवारी पालिका मुख्यालयात करण्यात आले. (Publication of a daily by the Commissioner giving information about the municipal services)

याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (विशेष) संजोग कबरे आणि मान्यवर उपस्थित होते. मुंबई महापालिकेची नागरी दैनंदिनी २०२४ ही मुंबई महापालिकेशी संबंधित विविधांगी माहितीने परिपूर्ण आहे. तसेच, सन २०२४ ची दिनदर्शिकादेखील अतिशय आकर्षक व उपयुक्त आहे. मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाच्या निमित्ताने सुशोभित मुंबईच्या आकर्षक छायाचित्रांनी यंदाच्या दिनदर्शिकेचे प्रत्येक पान सजलेले असल्याने ही दिनदर्शिका निश्चितच लक्ष वेधून घेणारी झाली आहे, असे उद्गार मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी काढले. ते महापालिकेच्या जनसंपर्क खात्यातर्फे प्रकाशित व मुंबई महापालिकेच्या मुद्रणालयाद्वारे मुद्रित करण्यात आलेल्या सन २०२४ च्या मराठी व इंग्रजी ‘नागरी दैनंदिनी २०२४’ (Civic Diary – 2024) आणि ‘दिनदर्शिका २०२४’ चे प्रकाशन करतेवेळी उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.

- Advertisement -

दैनंदिनी व दिनदर्शिका निर्मितीसाठी जनसंपर्क खात्यातील तसेच महापालिका मुद्रणालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. मुंबईकर नागरिकांना महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात येणा-या सोयीसुविधांची तपशिलवार माहिती आणि पदाधिकारी व अधिकारी, विभाग इत्यादींचे अद्ययावत संपर्क तपशील नागरी दैनंदिनीच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहचत असतात. या नागरी दैनंदिनीला नागरिकांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. महापालिकेचे जनसंपर्क खाते सन १९५८ पासून ‘नागरी दैनंदिनी’ (सिव्हिक डायरी) प्रकाशित करीत असून यंदा नागरी दैनंदिनीचे ६६ वे वर्ष आहे. नागरी दैनंदिनी ६६ वर्षांपासून सातत्याने प्रकाशित करीत असताना ती महत्त्वपूर्ण माहितीसह परिपूर्ण असेल, यावर दरवर्षी भर दिला जातो. यावर्षीच्या नागरी दैनंदिनीमध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या माहितीसह महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, मुंबईतील सन्माननीय खासदार, सन्माननीय विधिमंडळ सदस्य यांच्यासह महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सह आयुक्त, उप आयुक्त आणि इतर महानगरपालिका अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आहेत. महानगरपालिका पुरवित असलेल्या विविध नागरी सेवा- सुविधांची माहितीदेखील दैनंदिनीमध्ये समाविष्ट आहे. तसेच महत्त्वाचे नागरी संपर्क क्रमांक, सार्वजनिक सुट्टय़ा, नागरी प्रशासनाची माहिती अशी विविध उपयुक्त माहिती व महापालिकेशी निगडित काही छायाचित्रेही या दैनंदिनीत आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध ऐतिहासिक व महत्त्वाच्या ठिकाणांशी संबंधित छायाचित्रे यांचा समावेश असलेली दिनदर्शिका आणि माहितीपूर्ण नागरी दैनंदिनी यांची संकल्पना, आरेखन (Desing), व त्यासाठीचे छायाचित्रण इत्यादी बाबी या महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने करण्यात आल्या आहेत. तर नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकेचे मुद्रण हे मुंबई महापालिकेच्याच भायखळा येथील मुद्रणालयातील अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या आधारे करण्यात आले आहे. मुंबई सुशोभिकरण प्रकल्पातील अतिशय आकर्षक चित्रांचा समावेश दिनदर्शिकेत केला आहे, अशी माहिती सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी यानिमित्ताने दिली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Ayodhya Ram Mandir : भाजपाकडून राम मंदिर उद्घाटनाचा उत्सव; मुंबईतील प्रत्येक वॉर्डात करणार दीपोत्सव )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -