घरक्राइमBus Dumper Accident in MP: डंपरच्या धडकेनंतर बस पेटली; 13 जण जिवंत...

Bus Dumper Accident in MP: डंपरच्या धडकेनंतर बस पेटली; 13 जण जिवंत जळाले, अक्षरशः झाला कोळसा

Subscribe

भोपाळ – मध्यप्रदेशातील गुना येथे बुधवारी रात्री डंपरने प्रवासी बसला मारलेल्या जोरदार धडकेनंतर बसला आग लागली, यात 12 जण जिवंत जळाले. डंपर चालकाचाही मृत्यू झाला आहे. डंपर आणि बस अपघातात आतापर्यंत 13 जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. या अपघातात जवळपास 16 जण होरपळले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बस अपघात एवढा भीषण होता की मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाला होता. मृतदेह उचलत असताना त्याचे एक-एक अंग हे गळून पडत होते. अनेक मृतदेह हे एकमेकांना मिठी मारलेल्या स्थिती होते. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अपघाताबद्दल शोक संवेदना व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. त्यासोबतच बस अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (12 people burnt alive in bus and dumper accident in MP at Guna)

डंपर आणि बस अपघात बुधवारी रात्री साडे आठच्या दरम्यान झाला. बस गुनाहून आरोनच्या दिशेने जात होती, तेव्हाच समोर येणाऱ्या डंपरने धडक दिली. डंपरच्या धडकेने बस उलटली आणि आग लागली. दोन अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. गुनाचे पोलीस अधीक्षक विजय कुमार खत्री यांनी सांगितले की बसमध्ये जवळपास 30 प्रवाशी होते.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai Fire News : मालाडमधील शॉपिंग सेंटरमध्ये आग; 17 जण सुदैवाने बचावले

सात मृतदेह एकमेकांना मिठी मारलेले

अपघात किती भीषण होता हे यावरुनच कळेत की जेव्हा मृतदेह काढले जात होते, तेव्हा जळालेल्या मतृदेहांचे एक-एक अंग खाली पडत होते. डंपर चालकासह एकूण 13 मृतदेह घटनास्थळी मिळाले. बसमधून 9 मृतदेह बाहेर काढले गेले. त्यातील सात मृतदेह हे एकमेकांना मिठी मारलेले होते.

- Advertisement -

प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की घाटामध्ये डंपर चालक न्यूट्रलमध्ये डंपर खाली घेत होता, त्याच दरम्यान स्टिअरिंग आणि ब्रेक जाम झाले आणि डंपर थेट बसला जाऊन धडकला. बस उलटली आणि काही वेळाने बसने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तोपर्यंत SDRFचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. अजुनपर्यंत मृतांची ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी बसचे कागदपत्र तपासले आहेत. भानू प्रताप सिकर यांच्या नावाने ही प्रवासी बस आहे. बसचे रजिस्ट्रेशन, विमा आणि फिटनेस सर्व संपलेले आहे. बस खटारा झालेली होती.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये केले जाहीर
नवनियुक्त मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी डंपर-बस अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच मृतांच्या वारसांना 4-4 लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्या सिंधिया यांनीही बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -