घरमहाराष्ट्ररेमडेसिवीर घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ मोठ्या रांगा

रेमडेसिवीर घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ मोठ्या रांगा

Subscribe

पुण्यात आज रेमडेसिवीर इंजेक्शनची परिस्थिती जैसे थेच आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वितरणासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. दरम्यान बुधवारपासून पुणेकरांनी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र कालपासून रांगा लावूनही रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्याने रुग्णांचे नातेवाईक कमालीचे संतप्त झाले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. दरम्यान पुण्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोना रुग्णांना उपचारांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असते. मात्र इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्याने पुणे शहरातील अनेक मेडिकल स्टोरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाही. दरम्यान पुण्यात ज्या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध आहे त्याठिकाणी रुग्णांचे नातेवाईक मोठ मोठ्या रांगा लावून इंजेक्शन मिळण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजारही सुरु आहे.

- Advertisement -

पुण्यातील विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला थेट रुग्णालयात उपलब्ध करुन दिले जाईल. ज्य़ामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे इंजेक्शन मिळण्यासाठी अडचणी येणार नाहीत. परंतु पुण्यात आज रेमडेसिवीर इंजेक्शनची परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाचे संतप्त नातेवाईक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले आहेत. या संपप्त नागरिकांनी पुण्यातील बनगार्डन चौक अडवण्याचा  प्रयत्न केला. यावेळी पुणे पोलिसांकडून या संपत्प रुग्णांच्या नातेवाईकांना अडवण्यात आले असून त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आणण्यात आले आहे. सामान्य कोरोना रुग्णांना जगण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार की नाही? काळ्याबाजारात हे इंजेक्शन ४० ते ५० हजारात इंजेक्शन उपलब्ध होत आहेत तर शासनाकडे हा साठा का येत नाही असा सवाल या संतप्त रुग्णांच्य़ा नातेवाईकांकडून विचारला जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -