घरमनोरंजनदिग्दर्शक राम गोपाल वर्मा कुंभमेळ्यातील गर्दी पाहून संतापले, म्हणाले दुप्पट कर्म भोगावे...

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कुंभमेळ्यातील गर्दी पाहून संतापले, म्हणाले दुप्पट कर्म भोगावे लागतील

Subscribe

कुंभमेळ्या मधील लोकांच्या वाढती गर्दी पाहता यावर निंदा व्यक्त केली आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चित्रपटाव्यतिरिक्त अनेक सामाजिक, राजकारणातील मुद्यांवर सडेतोडपणे टीका करतात तसेच आपले मत मांडतात. नुकतच राम गोपाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वर ट्विट केल आहे त्याची जोरदार चर्चा होताना दिसतेय. सध्या हरिद्वार मध्ये कुंभमेळा सुरू झाला आहे. अनेक लोक शाही स्नान करण्यासाठी कुंभमेळ्यात दाखल झाले आहेत. या कारणांवरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चांगलेच भडकले आहेत. त्यांनी ट्वीटर वरुण कुंभमेळ्यात दाखल झालेल्या लोकांचा चांगलाच पाहुणचार केला आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले आहे की ”लाखो लोक कुंभमेळ्यात आपले कर्म स्वच्छ करण्यासठी डुबकी मारत आहेत, आणि त्यांना आशीर्वादाच्या रूपात कोविड मिळत आहे. आणि हेच लोक पुढे जाऊन अनेक लोकांमधे कोविडचा संसर्ग पसरवणार आहेत. जेव्हा हे लोक मरण पावतिल तेव्हा त्यांना दुप्पट कर्म भोगावे लागतील.”

- Advertisement -


तसेच आणखीन एक ट्विट करत राम गोपाल वर्मा पुढे लिहतात की ”१७ लाख मुंबईकरांना कोरोना लसीकरणसाठी ६ आठवड्यांचा कालावधी लागला होता. आणि ३५ लाख लोकांना महाकुंभात डुबकी मारण्यासाठी फक्त १ दिवस लागला आहे . याने सिद्ध होत आहे की लोकांना पुढील जन्माची या जन्मा पेक्षा जास्त चिंता आहे. ”

- Advertisement -

देशामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राम गोपाल वर्मा यांनी कुंभमेळ्या मधील लोकांच्या वाढती गर्दी पाहता यावर निंदा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी कुंभमेळ्याचे अनेक फोटो शेअर करून हा लोकांचा मूर्खपणा आहे असे देखील म्हंटले होते.


हे हि वाचा – अमिताभ बच्चन रमले सुपरहिट चित्रपटांच्या आठवणीत, म्हणाले… आता OTT प्लॅटफॉर्मकडून लाखो यशाचे आलेख निर्मिती

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -