घरमहाराष्ट्रमिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Subscribe

पुण्यामध्ये शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका आला आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पुण्याच्या मिलिटरी स्कूलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका आला आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील श्री. शिवाजी मिलिटरी स्कूलमधील ही धक्कादायक घटना आहे. मिलिटरी स्कूलकडून विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे.

prasanna shailendra patil
प्रसन्न शैलेंद्र पाटील

अभ्यास पूर्ण न केल्याने मारहाण

पुण्यातील एसएसपीएमएस या मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून झालेल्या अमानुष मारहाणीत मुलाला अर्धांगवायूचा झटका आल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे. प्रसन्न शैलेंद्र पाटील असं या विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळचा बारामतीचा आहे. एसएसपीएमएस या शाळेत प्रसन्न इयत्ता ६ वीच्या वर्गात शिकतो. दिवाळीच्या सुट्ट्यांपूर्वी शाळेतील अभ्यासक्रमाची एक असाइनमेंट पूर्ण न केल्याने शाळेतील शिक्षक संदीप गाडे यांनी प्रसन्नला मारहाण केली.

- Advertisement -

शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रसन्नने हा प्रकार भीतीपोटी घरातील कुणालाही सांगितला नाही. मात्र त्रास होत असल्याने काही दिवसांनी त्याचे कुटुंबिय त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता प्रसन्नने डॉक्टरांना शिक्षकाने मारहाण केल्याचे सांगितले त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. दरम्यान शाळेत असतानाच विद्यार्थ्याला त्रास होत होता. मात्र शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही प्रसन्नच्या पालकांनी केलाय. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्याकडून सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पालक आज शाळेत दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -