घरमुंबईकिसान सभेत 'चलो दिल्ली, घेरो संसद'चा नारा

किसान सभेत ‘चलो दिल्ली, घेरो संसद’चा नारा

Subscribe

भाजप सरकार शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देत आहे यामुळे आपल्या मागण्यांसाठी दिल्लीला जाण्याची घोषणा अखिल भारतीय किसान सभेमध्ये करण्यात आली.

कर्जमाफीच्या नावाने भाजप सरकारने शेतकऱ्यांची पूर्णतः फसवणूक केलेली आहे, सरकारने फक्त खोटी आकडेवारी जाहीर केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेमध्ये शेतकरी नेत्यांनी करत चलो दिल्ली घेरो संसदचा नारा दिला. त्यामुळे शेतकरी नेते आता सरकार विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी केंद्राने एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. अखिल भारतीय किसान सभेत हा ठराव मांडण्यात आला आहे.

काय म्हणाले नवले

“आपल्या विविध मागण्यांसाठी आम्ही २९ आणि ३० नोव्हेंबरला दिल्लीला धडकणार असून, केंद्र सरकारला संसदेत विशेष अधिवेशन घेण्यास भाग पाडणार आहोत. सरसकट कर्जमाफीच्या शब्दाचे काय झालं हे आपल्याला सगळ्याना माहीत आहे. शेतकऱ्यांचा या सरकारने विश्वास घात केला. यांचा आकडा १६ हजार कोटींच्या वर जायला तयार नाही. कर्जमाफीची मागणी आम्ही उपकार म्हणून मागत नाही तर आमचा हक्क म्हणून मागतो. मात्र हे सरकार फक्त आश्वासन देत आहे. बापाच्या जमिनीचा सातबारा क्लिअर होणार नाही तोवर आपण स्वस्त बसणार नाही असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.”- किसान सभेचे नेते अजित नवले

- Advertisement -

किसान सभेला विरोधकांची हजेरी 

या किसान सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच शेकापचे जयंत पाटील यांनी देखील हजेरी लावली. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या या लढ्यात आता विरोधक देखील सरकारला कोंडीत पकडणार हे मात्र नक्की.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -