घरमहाराष्ट्रपुणेPune, Mumbai Expressway : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक

Pune, Mumbai Expressway : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक

Subscribe

दोन दिवसांपूर्वी  मुंबई पुणे एक्स्प्रेसवर दरड कोसळली होती. त्यानंतर डोंगऱावरील दगड मातीही पावसाच्या संततधारेमुळे सैल होऊन  एक्सप्रेसवर वर पडत आहे.ती हटवण्यायाचे काम सुरू असल्याने आज १२ ते २ या वेळेत एक्सप्रेसवेवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

रविवारी २३ जुलै रोजी रात्री एक्सप्रेसवरील आडोशी बोगदयाजवळ दरड कोसळली. ही दरड हटवण्यासाठी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन लेन बंद ठेवण्यात आल्या होत्या. पण  पावसामुळे दरड हटवण्याच्या कामास विलंब होत असल्याने आज १२ ते २ या वेळेत ही दरड हटवली जाणार आहे. यामुळे या वेळांमध्ये एक्सप्रेसवेवरील वाहतूक बंद ठेवून ती जुन्या मुंबई पुणे एक्स्प्रेसकडे वळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -