घरमहाराष्ट्रखासदार अमोल कोल्हेंच्या नावाने खंडणीची मागणी, दोन आरोपी गजाआड

खासदार अमोल कोल्हेंच्या नावाने खंडणीची मागणी, दोन आरोपी गजाआड

Subscribe

खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे सांगून नागरिकांना काही तरी मदत करा, निधी द्या, असे सांगून त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला. याबाबत गेरा यांनी चौकशी केली असता त्यांना खासदार कोल्हे यांनी फोन केला नसल्याची माहिती समोर आली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाने एका बिल्डरला फोन करून फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीने चंद्रकांत पाटील यांच्या नावानेदेखील फोन केल्याचे माहिती उघड झाली आहे. विशाल अरुण शेंडगे (वय ३२, रा. टिळेकर नगर, कोंढवा) व त्याला मदत करणारा सुरेश बंडू कांबळे (रा. गंज पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची आरोपींची नावे आहेत. याबाबत गेरा बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहितकुमार गेरा (रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लॉकडाउनमध्ये  गेरा बिल्डर्स यांना आरोपी शेंडगे याने फोन केले असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे सांगून नागरिकांना काही तरी मदत करा, निधी द्या, असे सांगून त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला. याबाबत गेरा यांनी चौकशी केली असता त्यांना खासदार कोल्हे यांनी फोन केला नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्त व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रार अर्जाची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी केली जात होती. त्यावेळी कोल्हे यांच्या नावाने फोन करणारी व्यक्ती शेंडगे असल्याचे समोर आले.  याप्रकरणात आतापर्यंत त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. तो एका गुन्ह्यात अटक होता. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने हा प्रकार केला आहे.
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -