घरक्रीडाAUS vs NZ : भारतीय टॅक्सी चालकाचा मुलगा ऑस्ट्रेलियाच्या 'संघा'त! 

AUS vs NZ : भारतीय टॅक्सी चालकाचा मुलगा ऑस्ट्रेलियाच्या ‘संघा’त! 

Subscribe

ऑस्ट्रेलियन संघात निवड भारतीय वंशाचा केवळ दुसरा खेळाडू. 

फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका होणार आहे. भारतातून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झालेल्या टॅक्सी चालकाचा मुलगा तन्वीर संघा (Tanveer Sangha) याचा या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन संघात निवड झालेला तन्वीर हा भारतीय वंशाचा केवळ दुसरा खेळाडू आहे. ‘माझी ऑस्ट्रेलियन संघात निवड झाल्याचे कळल्यावर खूप आनंद झाला होता. मला काही काळ यावर विश्वास बसत नव्हता. इतक्या लहान वयात मला ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते,’ असे तन्वीर एका मुलाखतीत म्हणाला. १९ वर्षीय लेगस्पिनर तन्वीर सध्या सुरु असलेल्या बिग बॅश लीग टी-२० स्पर्धेत सिडनी थंडर संघाकडून खेळत आहे. त्याने यंदाच्या मोसमात पदार्पण करताना १४ सामन्यांत २१ विकेट घेतल्या असून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

वडील अजूनही चालवतात टॅक्सी

तन्वीरचे आई-वडील १९९७ मध्ये जलंधरहून सिडनी येथे स्थलांतरित झाले. त्याचे वडील जोगा सिंग संघा ‘स्टुडंट व्हिसा’वर ऑस्ट्रेलियात गेले. जोगा यांनी सुरुवातीला शेती केली आणि मग त्यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. ते अजूनही टॅक्सी चालवण्याचे काम करत आहेत. तन्वीरची आई अकाउंटंट आहे.

- Advertisement -

तन्वीरचे भविष्य उज्ज्वल

तन्वीरची आता ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड झाली असली तरी त्याच्यावर फार दबाव टाकणे योग्य नाही, असे काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या निवड समिती सदस्य ट्रेवर हॉन्स म्हणाले. ‘आम्ही एक-दोन वर्षांपूर्वी तन्वीरबाबत ऐकले होते आणि आता तो इतक्या कमी वयात बिग बॅश लीगमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही. परंतु, तो अजून खूप युवा आहे. त्यामुळे त्याच्यावर फार दबाव टाकणे योग्य नाही,’ असे हॉन्स म्हणाले.


हेही वाचा – IPL 2021 : अर्जुन तेंडुलकरला ‘हा’ संघ करणार खरेदी?  

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -