घरमहाराष्ट्रपुणेKoregaon Bhima विजयस्तंभाच्या स्मारकासाठी शासनाने 'शंभर' एकर जमीन संपादीत करावी; आठवलेंची मागणी

Koregaon Bhima विजयस्तंभाच्या स्मारकासाठी शासनाने ‘शंभर’ एकर जमीन संपादीत करावी; आठवलेंची मागणी

Subscribe

पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाजवळची शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादीत करून येथे शौर्याची प्रेरणा देणारे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे. त्यासाठी राज्य सरकारने 500 कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (01 जानेवारी) केली. तसेच या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून लवकरच पत्र देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Government to acquire hundred acres of land for Koregaon Bhima Vijayastambha memorial Ramdas Athawale demand)

हेही वाचा – …म्हणून ‘Viksit Bharat Sankalp Yatra’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची सरकारवर नामुष्की; काँग्रेसचा हल्लाबोल

- Advertisement -

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी रामदास आठवले यांनी भेट देऊन विनम्र अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, कोरेगाव भीमा लढाईचा इतिहास हा पूर्वाश्रमीच्या महार पूर्वजांच्या अतुलनीय शौर्याचा प्रेरणादायी इतिहास आहे. हा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दाखवून आमच्यातील शौर्याचा क्रांतीचा निखारा जागृत केला आहे. तीच शौर्याची, क्रांतीची, संघर्षाची प्रेरणा घेऊन जीवनात मार्गक्रमण करण्याचा आमचा आजचा नवीन वर्षाचा संकल्प आहे, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

आंबेडकरी जनतेच्यावतीने दरवर्षी 1 जानेवारी हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो. लाखो आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला भेट देऊन विनम्र अभिवादन करतात. त्यासाठी येथे जागा अपुरी पडत आहे. या परिसरातील 100 एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक विजय स्तंभाचे भव्य आंतररष्ट्रीय स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने 500 कोटीच्या निधीची तरतूद केली पाहिजे, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मोदींना थांबविणे अशक्यच; विदेशी मीडियाचा दावा

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल

कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी विविध प्रश्नांवर संवाद साधताना रामदास आठवले यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, 2024 हे नवीन वर्ष विकासाचे आणि निवडणुकीचे वर्ष आहे. या वर्षात दलित आदिवासी ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, दिव्यांग सर्व नागरिकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे विकासाचे वर्ष ठरणार आहे. मोदींच्या नेतृत्वात सर्वांना न्याय मिळत आहे. नव्या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -