घरमहाराष्ट्र'राहुल गांधींनी राष्ट्रवादीत जाण्यास सांगणे हे धक्कादायक'

‘राहुल गांधींनी राष्ट्रवादीत जाण्यास सांगणे हे धक्कादायक’

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज, पहिल्यांदाच आपले म्हणणे मांडले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज, पहिल्यांदाच आपले म्हणणे मांडले. त्यांनी अहमदनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. अहमदनगरच्या जागेबाबत राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर, मला सुजय विखेंना काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याचा सल्ला दिला. राष्ट्रवादीकडून लढा हे राहुल गांधींनी सांगणे धक्कादायक होतं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा मंजूर झाला असला तरी सध्या ते पक्ष सोडणार नाहीत. यासंबंधीचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

काय म्हणाले विखे पाटील

साडेचार वर्षे विरोधी पक्षनेतेपद सांभाळण्यांचे फलीत काय तर काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडून लढण्याचा सल्ला मिळणं, हे दुदैवी होते, असेही त्यांनी म्हटले आहे. राजीनाम्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतील, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी आज गेल्या काही दिवसांत ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या, त्याचा खुलासा केला. पक्षश्रेष्ठींकडे आपल्याबाबत चुकीच्या तक्रारी केल्या गेल्या, असे सांगत त्यांनी नाराजीही व्यक्त केली. आमच्या पक्षातील काही लोकांनी राष्ट्रवादीने जागा सोडू नये, अशी भूमिका घेत विरोधक म्हणून काम केले, असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

याकरता सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

राष्ट्रवादीचा उमेदवार नगरमध्ये तीनदा पराभूत झाला होता. म्हणून ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी आमची मागणी होती. सुजय विखेंच्या निवडून येण्याची क्षमता असल्याने त्यांना उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी होती. यासाठी आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आमचे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. त्यानंतर डॉ. सुजय विखेंनी भाजपात जात असल्याचे जाहीर केले, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दक्षिण अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. सुजय विखेंनी भाजपमध्ये का प्रवेश केला, यावरही राधाकृष्ण विखेंनी स्पष्टीकरण दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -