घरमहाराष्ट्र'औषधालाही कमळ शिल्लक राहणार नाही'

‘औषधालाही कमळ शिल्लक राहणार नाही’

Subscribe

कोल्हापूरमधील महायुतीच्या प्ररचारादरम्यान केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे.

महाराष्ट्रात असे तणनाशक फवारणार आहे, ज्यामुळे औषधाला सुद्धा कमळ दिसणार नसल्याची खोचक टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सुरूवात रविवारी कोल्हापूरमधून झाली. यावेळी भाजपच्या नेत्यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली होती. याच टीकेला राजू शेट्टी यांनी चोखप्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, त्यांनी उध्दव ठाकरे आणि सदाभाऊ खोत यांच्यावर देखील टीका केली आहे.

औषधालाही कमळ उरणार नाही

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान सर्वच पक्ष एकमेकांवर टीका करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरात राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. याच टीकेला सडेतोड उत्तर राजू शेट्टी यांनी दिले आहे. ‘आमचे बोट धरून तुम्ही शिवारात आला आहात आणि आता आम्ही असे तणनाशक महाराष्ट्रात फवारणार आहोत. ज्यामुळे औषधाला सुद्धा कमळ दिसणार नाही’, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केली आहे.

- Advertisement -

उध्दव ठाकरेंनी शहाणपणा शिकवू नये

दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ‘चौकीदार चोर म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मला शहाणपणा शिकवू नये, असा असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेट्टी हे चोराच्या आळंदीला गेल्याची टीका केली होती. त्यांच्या टिकेला उत्तर देताना, चौकीदार चोर आहे असे म्हणणाऱ्यांनी आधी चौकीदार सज्जन कधी झाला, हे सांगावे, असा टोला राजू शेट्टी यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

आपल्या भविष्याचा विचार करा

दरम्यान, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेचा समाचार राजू शेट्टी यांनी घेतला आहे. ‘काटा मारणाऱ्या साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून शेट्टी बसले आहेत. त्यांचा काटा जनता काढेल’, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केली होती. सदाभाऊ खोतांच्या या टीकेचा समाचार घेताना शेट्टींनी खोत यांना ‘लुंग्या संग्याची उपमा देत, आपल्या भविष्याचे काय होईल? याचा विचार करावा’, असा खोचक सल्ला दिला आहे. तसेच, ‘महायुतीच्या व्यासपीठावरच काटा मारणारे किती कारखानदार होते, हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करू’, असा टोला देखील त्यांनी सदाभाऊ खोतांना लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -