घरदेश-विदेशमी निवडणूक लढवत नाहीये - संजय दत्त

मी निवडणूक लढवत नाहीये – संजय दत्त

Subscribe

बॉलिवूड अभिनेता दहा वर्षानंतर पुन्हा निडणूक लढवणार असल्याची बातमी झळकत होत्या. मात्र संजय दत्तने या बातमीचे खंडन केले आहे. आपल्या ट्विटरवरून त्याने ही माहिती शेअर केली आहे.

निवडणूक तोडांवर आली की बॉलिवूड कलाकार हे पक्षातून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण येते. हरियाणी डान्सर आणि गायक सपना चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्या बातमी नुकतीच प्रसार माध्यमांमध्ये होती. मात्र तिने याचे खंडण केले होते. अशीच एक घटना बॉलिवूडमध्येही समोर आली आहे. बॉलिवूडचा खलनायक म्हणजेच संजय दत्त दहा वर्षांनी पुन्हा सायकल चालवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. संजय दत्त समाजवादी पार्टीकडून गाझियाबाद येथून निवडणूल लढवणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र यावर कोणीही अधिकृत भाष्य केलेले नव्हते. अखेर संजय दत्त याने आपल्या अधिकृत ट्विटरवरून निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

गाझियाबाद येथून निवडणूक लढण्याची चर्चा

अभिनेता संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात होती. संजय दत्त यांनी २००९ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. राज्यसभा खासदार अमर सिंह यांच्या आग्रहामुळे संजय यांनी ‘सपा’मध्ये प्रवेश केला होता. दरम्यान ‘सपा’मधून अमरसिंह बाहेर झाल्यानंतर संजय दत्त यांनी देखील पक्षापासून स्वत:ला वेगळे केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -