घरमहाराष्ट्रराजकीय सारीपाटावर रंगणार खेळाडूंची टक्कर

राजकीय सारीपाटावर रंगणार खेळाडूंची टक्कर

Subscribe

वर्धा मतदार संघात कुस्तीपटू रामदास तडस यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसने तडस यांच्या विरोधात नेमबाज चारूलता टोकस यांना उमेदवारी दिली आहे.

राज्यातील वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार आणि कुस्तीपटू रामदास तडस यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसने तडस यांच्या विरोधात नेमबाज चारूलता टोकस यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येत्या ११ एप्रिलरोजी रंगणा-या राजकीय सारीपाटात तडस मैदान मारतात की, टोकस निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विदर्भ केसरीचा खिदाब पटकावला होता

लोकसभेच्या रणांगणात २०१४ साली रामदास तडस यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. दस्तुर खुद्द नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचारार्थ वर्धेत सभा घेतली होती. त्यामुळे २०१४ साली या खासदार कस्तीपटूने वर्धेचा किल्ला लिलया सर केला होता. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी खा. तडस हे नामचिन मल्ल म्हणून विदर्भात सुपरिचीत आहेत. त्यांनी १९६८ साली नागपूर केसरी, तर १९७०, ७२, ७४ आणि १९७६ साली विदर्भ केसरीचा खिदाब पटकावला होता. त्यासोबतच पुण्यातील महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेचे त्यांनी तब्बल १८ वर्षे प्रतिनिधीत्त्व केले असून सध्या विदर्भ कुस्तीगिरी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा ते सांभाळताहेत.

- Advertisement -

नेमबाज चारूतला

भाजपच्या मातब्बर मल्लाविरोधात काँग्रेसने देखील चारूलता टोकस यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवला आहे. नेमबाज चारूतला या रायफल शुटिंगमध्ये तरबेज आहेत. त्यांनी १९८५ ते १९९१ या कालखंडात नॅशनल खेळाडू म्हणून मैदान गाजवले आहे. टोकस यांनी १९८६ साली झालेल्या एशियन खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करत सिल्व्हर मेडल पटकावले होते. तर १९९१ साली त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राजकारणात निवडणुका म्हणजे युद्ध असून युद्धात सारे क्षम्य असते. परंतु, वर्धा मतदारसंघात दोन खेळाडू समोरासमोर उभे ठाकल्यामुळे या लढतीत खिलाडू वृत्ती अबाधित रहावी अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त होतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -