घरCORONA UPDATEराणे शिवसेनेमुळेच मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले - गुलाबराव पाटील

राणे शिवसेनेमुळेच मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले – गुलाबराव पाटील

Subscribe

राणेंवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

नारायण राणे यांचे शिवसेनेशी जुने नाते आहे. शिवसेनेमुळेच ते मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले, अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे. भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारवर टीका करत राज्यात राष्ट्रपती राजवट जाहीर करायला हवी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राणेंवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

कोरोना ही जागतिक महामारी आहे. ती काही महाराष्ट्राने आणलेली नाही. जगासह देशात तिचा प्रादुर्भाव झाला आहे. ही एक आपत्ती आहे. राजकारणाची व्यवस्था नाही. या महामारीचा सामना करण्यासाठी सर्वांनी सरकारला साथ देण्याची गरज आहे. उपाययोजनांमध्ये कुठे त्रुटी राहत असतील तर त्या सरकारच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. पण असे न करता राज्यपालांकडे जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे योग्य नसल्याचे गुलाबराव पाटील म्हणालेत.  दरम्यान नारायण राणे यांच्यासारख्या मुख्यमंत्री पद भूषवलेल्या व्यक्तीला ‘या’ गोष्टी शोभत नाहीत”, असे देखील ते म्हणालेत. कोरोनाचा उद्रेक काय फक्त महाराष्ट्रात नाही. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. मग अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर महाराष्ट्रासोबत गुजरातमध्येही लागू करावी, उत्तरप्रदेशात तसेच दिल्लीतही लागू करावी. देशातील इतर राज्यांमध्येही ती लागू केली पाहिजे. कोरोनाच्या आपत्तीला राजकारणाचा रंग न देता समाजसेवेच्या माध्यमातून, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या आपत्तीवर मात कशी करता येईल? या दृष्टीने सूचना त्यांनी द्याव्यात, अशी आमची अपेक्षा आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -