घरअर्थजगतसरकार जन धन खात्यात महिन्याला ५०० रुपये देतंय; हे खातं कसं उघडायचं...

सरकार जन धन खात्यात महिन्याला ५०० रुपये देतंय; हे खातं कसं उघडायचं ते जाणून घ्या

Subscribe

जन धन बँक खाते कोरोना साथीच्या काळात गरिबांसाठी उपयुक्त असल्याचं सिद्ध होत आहे. लॉकडाऊन दरम्यान गरिबांना स्वतःचं घर चालवताना आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत महिलांच्या जनधन खात्यावर ५००-५०० रुपयांचा हप्ता पाठवत आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी सरकारने २० कोटी महिलांच्या खात्यात ५००-५०० रुपये पावण्याची घोषणा केली आहे. एप्रिल आणि मेचे हप्ते पाठविण्यात आले आहेत. देशातील २०.०५ कोटी जन जन खातेधारकांच्या खात्यावर ५०० रुपयांचे दोन हप्ते पाठवले गेले आहेत.

सध्या देशात ३८.५७ कोटी लोकांचं जनधन खातं आहे. त्यापैकी सुमारे २०.०५ कोटी महिलांच्या नावावर जनधन खाती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी जन धन योजना जाहीर केली आणि ती २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली. रणे हा त्याचा हेतू होता. जन धन खाते अनेक बाबतीत महत्त्वाचे आहे, प्रत्येक नागरिकास बँकिंग सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे, असं सरकारचं लक्ष्य आहे. जनधन खाते उघडणे खूप सोपे आहे आणि अद्याप तुमच्याकडे बँक खाते नसेल तर तुम्ही जनधन खाते उघडू शकता.

- Advertisement -

कोणताही भारतीय नागरिक या योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्ज करू शकतो. अर्जदाराचे वय किमान १० वर्षे असावे. कोणत्याही जवळच्या बँकेत जाऊन किंवा बँक मित्राद्वारे आपण जन धन खाते उघडू शकता. एकूण खात्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक महिलांची नावे आहेत, तर ग्रामीण व निमशहरी भागात सुमारे ५९ टक्के खाती उघडली गेली आहेत. पीएमजेडीवाय (PMJDY) अंतर्गत उघडलेल्या खात्यावर खातेधारक कर्ज म्हणून ६ महिन्यांनंतर १०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज देखील घेऊ शकतात.


हेही वाचा – मरकज प्रकरण: ८३ विदेशी नागरिकांविरोधात १४ हजार पानांचे २० आरोपपत्र दाखल

- Advertisement -

जन धन खातं हे झिरो बॅलंस खातं आहे, म्हणजे किमान शिल्लक बाबत कोणतीही समस्या नाही. सर्वसामान्यांना बॅंकांशी जोडण्यासाठी आणि त्यांना विमा आणि पेन्शन यासारख्या आर्थिक सेवा उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली गेली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -