घरमहाराष्ट्रमहाड-रायगड मार्गाची सावली हरपणार

महाड-रायगड मार्गाची सावली हरपणार

Subscribe

रस्ता रुंदीकरणात झाडांचा बळी,सावली देणारे वृक्ष गळून पडले

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाकडे जाणार्‍या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून या रुंदीकरणात येणार्‍या वृक्षांची तोड करण्यास सुरवात झाली आहे. यामुळे गेली अनेक पिढ्या रस्त्यावरील ये जा करणार्‍या प्रवाशांना, शिवप्रेमींना सावली देणारे वृक्ष यंत्राच्या आणि विकासाच्या कात्रीत गळून पडत आहेत. यामुळे या मार्गावरील स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आणि तमाम महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या किल्ले रायगडच्या संवर्धनाचे काम सुरु झाले आहे. शिवाय किल्ले रायगडाच्या परिसरातदेखील विकासकामे सुरु करण्यात आली आहेत. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून ही कामे केली जात असून किल्ले रायगडाकडे जाणार्‍या मार्गाचेदेखील रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण केले जाणार आहे. याकरिता रस्त्याच्या दुतर्फा असलेले शेकडो वृक्ष या कामात बाधित होत आहेत. महाडपासून किल्ले रायगडापर्यंत जवळपास वृक्षांची तोड होणार आहे. या कामासाठी सुरुवात झाली आहे. महाड नाते खिंड ते किल्ले रायगडपर्यंत ऐन, उंबर, आदी वृक्ष उभे आहेत.

- Advertisement -

यामुळे दोन्ही बाजूने रस्त्यावर सावली निर्माण होते. महाडापासून ही सावली किल्ले रायगडपर्यंत असल्याने या मार्गात कायम उन्हाळ्याच्या दिवसात सावालीमुळे वातावरणात कायम थंडावा टिकून राहतो. किल्ले रायगडावर ये जा करणारे शिवप्रेमी, पर्यटक रस्त्याकडेला असलेल्या वृक्षाच्या सावलीत विसावा घेवून पुढे मार्गस्थ होत असतात. किल्ले रायगडावर शिवजयंती, शिवपुण्यतिथी, राज्याभिषेक असे विविध कार्यक्रम होतात. यावेळी येणार्‍या लाखो शिवभक्तांचा आधार म्हणून या वृक्षांनी आधार दिला आहे. या झाडांच्या सावलीतच शैक्षणिक सहलींच्या विद्यार्थ्यांनी वनभोजन केले आहे. रस्त्याच्या दुपदरीकरणात हे वृक्ष वाचवता येणे शक्य असल्यास वाचवणे आवश्यक होते.

महाड-रायगड या २४ किमीच्या मार्गाचे रुंदीकरण होत आहे. याकरिता जवळपास दोनशे कोटी रुपये खर्च होणार आहे. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. सध्या हे काम सुरू झाले असून या दुपदरीकरण कामात मार्गाशेजारील १०३८ वृक्ष तोडले जाणार आहेत.

- Advertisement -

दुपदरीकरण कामात एका बाजूचे वृक्ष वाचवता आले असते, मात्र गेल्या काही वर्षात विविध प्रकल्प होत असताना वृक्ष वाचण्याबाबत विचार झाला नाही. मात्र किमान रायगड मार्गाबाबत तरी शासनाने विचार करावा                  – अविनाश चव्हाण, निसर्ग प्रेमी, महाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -