घरताज्या घडामोडीपेट्रोलच्या दरांसारखे आयुष्याचे शतक पार करा, रोहित पवारांच्या अर्थमंत्र्यांना खोचक शुभेच्छा

पेट्रोलच्या दरांसारखे आयुष्याचे शतक पार करा, रोहित पवारांच्या अर्थमंत्र्यांना खोचक शुभेच्छा

Subscribe

देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पेट्रोलच्या दरांसारखे आयुष्याचे शतक पार करा अशा शब्दांत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार रोहित पवार पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवर टीका करत असतात. इंधन दरवाढीचा धागा पकडत आताही रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांनी दिलेल्या शुभेच्चांवर नेटकऱ्यांनी अनेक गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्यात आणि देशात पेट्रोल डिझेलच्या दराने शतक पार केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या असून या शुभेच्छांबाबत चर्चा रंगू लागली आहे. रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे की, “देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणांस उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना” अशा खोचक शब्दांत रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलयं की, १ जुलै १९७२ नंतर शासन सेवेत दाखल झालेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन लागू करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला असून या निर्णयाच्या अधीन राहून शासनाने पूर्वलक्षी प्रभावाने सेवानिवृत्ती वेतन लागू करण्याची ‘महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन’ची मागणी आहे. याबाबत त्यांनी मला निवेदन दिलं. त्यानुसार वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. लवकरच हा निर्णय लागू करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं असल्यचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

इंधन दरवाढीवर रोहित पवार यांची टीका

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे राज्यातील पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंधनाचे दर नियंत्रणात आणणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करण्यासाठी काही पावले उचलले तर इंधनाचे दर स्थिर राहतील असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -