घरमहाराष्ट्रराज्यात आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू

राज्यात आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू

Subscribe

कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे ही सोडत स्थगित करण्यात आली होती. परंतु आता सोडतीमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास शुक्रवारपासून सुरूवात करण्यात आली आहे.

शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (आरटीई) विनाअनुदानित शाळांतील २5 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी 17 मार्चला काढण्यात आरटीई सोडत काढण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे ही सोडत स्थगित करण्यात आली होती. परंतु आता सोडतीमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास शुक्रवारपासून सुरूवात करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाकडून जाहीर झालेल्या सोडतीत राज्यभरात १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली, तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील मेसेज पालकांना मोबाईलवर पाठवण्यात आले असून, त्यानुसार पालकांनी आवश्यक कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती शाळेत सादर करून त्याची पडताळणी करायची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात येईल, तसे हमीपत्र पालकांनी शाळेला द्यावे. शाळेने दिलेल्या दिनांकास उपस्थित राहणे शक्य नसल्यास पालकांनी तसे शाळेला कळवावे व पुढील दिनांकाची मागणी करावी. शाळेच्या मेसेज वर अवलंबून न राहता आर.टी.ई. पोर्टलवर विद्यार्थ्यांचा क्रमांक टाकून प्रवेशाच्या दिनांकाची खात्री करावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून पालकांना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या प्रवेशाबाबत मेसेज, फोन, ऑनलाईन पोर्टलवर प्रवेशाचा दिनांक दिसून आल्यास त्याच दिनांकास जावे, तोपर्यंत शाळेत अथवा पडताळणी केंद्रावर गर्दी करू नये . अशा प्रकारचे आवाहनही शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

चुकीची कागदपत्रे सादर केल्यास कारवाई

पडताळणी समितीस कागदपत्रे चुकीची आढळून आल्यास व आर.टी.ई. पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास हमी पत्रातील अटीप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -