घरताज्या घडामोडीमुंबईत लवकरच मॉन्सून परतणार

मुंबईत लवकरच मॉन्सून परतणार

Subscribe

गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबईत पावसाचा लपंडाव सुरू आहे. काही भागातील तुरळक सरी वगळता मुंबईत मोठा पाऊस झालेला नाही. पण येत्या २ ते ३ दिवसात मात्र पावसाचे कमबॅक होईल असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह शहराच्या नजीकच्या परिसरात पावसाची हजेरी लागेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील अनेक भागात हलक्या सरींचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवला आहे. शहर तसेच उपनगरात पावसाच्या तुरळक सरी येत्या दिवसांमध्ये पडतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

याआधी मुंबईत १८ जूनला मोठ्या पावसाची हजेरी लागली होती. त्यावेळी मुसळधार पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला. त्याआधीही जूनच्या सुरूवातीच्या आठवड्यातच २ जून आणि ५ जूनला मुंबईत जोरदार पाऊस झाला होता. निसर्ग चक्रीवादळानेही मुंबई नजीकच्या भागात मोठा परिणाम पहायला मिळाला होता. पण गेल्या काही दिवसात मात्र पावसाने दडी मारली आहे. मुंबईत दरवर्षी होणारा मॉन्सुनचा मोठा तडाखा यावेळी अद्यापही मुंबईकरांनी अनुभवलेला नाही. मुंबई शहर आणि उपनगरातही अजुनही म्हणावा तितका पाऊस झालेला नाही. गेल्या २४ तासांमध्ये तर मुंबईत पाऊसच पडला नसल्याची नोंद प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडे झालेली आहे. तर स्कायमेटने मांडलेल्या अंदाजानुसार येत्या २७ जूनपर्यंत पावसाची कोणतीही शक्यता नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबईतले सरासरी तापमान वाढल्याने मुंबईकरांना सध्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणामुळेच मुंबईकरांच्या उकाड्यात भर पडत सध्या अस्वस्थ वाटणारे असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. मुंबईत दिवसासोबतच रात्रीच्या वेळेतही तापमान वाढीचा फटका मुंबईकरांना अनुभवायला मिळू शकतो. महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड आदी भागातही सध्या उकाड्याचे वातावरण नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. मुंबईत जसा पावसाने ब्रेक घेतला आहे तसाच अनुभव राज्यातील उर्वरीत भागातील लोकांनाही अनुभवायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी गेल्या २४ तासांमध्ये पावसाची नोंद ० मिमी इतकी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -