घरदेश-विदेशदिल्लीसारखी अफवा इगतपुरीत?

दिल्लीसारखी अफवा इगतपुरीत?

Subscribe

हजारो मजुरांचे गोरखपूर-काशी एक्स्प्रेसमध्ये ठाण

मुंबई आग्रा महामार्गावरील घाटनदेवी मंदिर जवळ असलेल्या चेकपोस्ट येथे स्वताः तहसीलदार अर्चना पागीरे व पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी तळ ठोकून आहेत. सर्व वाहनांची कसून चौकशी केली जात असून अत्यावश्यक वाहनांनाच नाशिकडे सोडले जात आहे. विनाकारण प्रवास करणार्‍या वाहनांना पुन्हा मुंबईच्या दिशेने पाठवून देण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर आदी ठिकाणचे परप्रांतीय कामगार हे आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई आग्रा महामार्गाने निघाले आहेत. त्यांना प्रवासी वाहन न मिळाल्याने आणि दिल्लीसारखी अफवा पसरल्याने ते सर्व रविवारी सकाळी इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने ते जमा झाले. ते सर्व रेल्वे स्टेशनवर रिकामी उभी असलेली गोरखपुर काशी एक्स्प्रेसमध्ये ठाण मांडून बसले होते. तर हजारो नागरिक छुप्या पध्दतीने खाजगी वाहनांने पुढे नाशिककडे गेल्याचे समजते. तर काही प्रवासी थेट महामार्गाने भरऊन्हात नाशिककडे पायी जात आहेत. इगतपुरी शहरात जवळपास चार ते पाच हजार नागरीक एकाच वेळी शहरात आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

करोना या जीवघेण्या विषाणूने सध्या देशात थैमान घातले आहे. वाढत चाललेल्या या भयंकर विषाणूंच्या प्रार्दुभावामुळे देशातील व महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद करण्यात आल्यामुळे परराज्यातील परप्रांतीय हाताला काम नसल्याने व जवळ पैसा नसल्याने मिळेल त्या वाहनाने चोरट्या मार्गाने आपल्या राज्यात आपआपल्या गावी जाण्यासाठी धडपड करीत आहे. मुंबईहून रोज रिकाम्या एक्स्प्रेस भुसावळला पाठवून तेथे गाडी निर्जंतूक करून या गाड्या लखनऊ, कोलकत्ता, दिल्लीकडे पाठविण्यात येत आहेत.

महामार्गाहुन चार ते पाच हजार नागरिक इगतपुरीत उभ्या असलेल्या लखनऊ एक्सप्रेसमध्ये बसले असुन या गाडीने पुढील प्रवास करता येईल व आप आपल्या राज्यात गावी जाता येईल या आशेवर बसले आहेत. परंतु रेल्वे सेवा ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने येथील रेल्वे स्टेशन मास्तर प्रेमचंद आर्या यांना ही रेल्वे गाडीपुढे सोडविण्यासाठी परवानगी देण्यात आली नसल्याने ही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येणार असल्याची माहीती दिली आहे. सध्या ही गाडी इगतपुरी रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली होती. दुपारी पुढील सुचना मिळाल्यानंतर ही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान हे परप्रांतीय सरळ महामार्गाने पायी प्रवास करुन कसारा घाटचढून घाटनदेवी मंदिराजवळील जिल्हाबंदी चेकपोस्ट वर एकच गर्दी केल्याने येथे तैनात असलेल्या पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. रेल्वेच्या मेंटनस कामासाठी या गाडीत काही रेल्वे कामगार या गाडीत बसले होते. मात्र जवळपास चारपाचशे प्रवासीही कल्याण कसारा येथुन या गाडीत प्रवासासाठी बसले असल्याने रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवान काय करीत होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -