घरमहाराष्ट्रSambhaji Chhatrapati : 'छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे'... संभाजी राजे छत्रपतींचा रोख...

Sambhaji Chhatrapati : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे’… संभाजी राजे छत्रपतींचा रोख कुणाकडे?

Subscribe

हजारो वर्षांची प्रतीक्षा आता पुढी काही क्षणात संपणार असून, हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पुढील काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच दरम्यान छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X पूर्वीचे ट्वीटरवर पोस्ट करत आपल्या पुत्राचे नाव “राम” ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे त्यांच्यावर जिजाऊ मासाहेबांनी केलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्याच आदर्श संस्कारांवर आधारीत होते, यास इतिहास प्रमाण आहे. असे म्हटले आहे. तेव्हा छत्रपती संभाजी राजेंचा रोख कुणाकडे अशी चर्चा सध्या रंगत आहे. (Sambhaji Chhatrapati  Chhatrapati Shivaji Maharajs Swarajya’… Sambhaji Raje Chhatrapatis cash to whom)

हजारो वर्षांची प्रतीक्षा आता पुढी काही क्षणात संपणार असून, हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. काही क्षणापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात दाखल झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा मंदिर परिसरात दाखल झाला आहे. याच दरम्यान माजी खासदार संभाजी राजेंनी इतिहासाला उजाळाला देत छत्रपती शिवाजी महराजांचे स्वराज्य आदर्शवत कसे होते याबाबत भाष्यं केलं आहे.

- Advertisement -

काय लिहिले संभाजी राजे यांनी पोस्टमध्ये?

राम मंदिर लोकार्पण आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शुभेच्छा देणारी पोस्ट माजी खासदार संभाजी राजे छत्रपतींनी केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, प्रभू श्री रामचंद्र वनवासातून जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा सर्व प्रजा आनंदून गेली होती. आज गेल्या कित्येक शतकांचा वनवास संपवून अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात हर्षोत्सव साजरा होत आहे. आपल्या सर्वांसाठी केवळ अभिमानाचीच नव्हे तर एक समाधानाची व गौरवास्पद अशी ही ऐतिहासिक घटना असल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis : भारताची नवीन अस्मिता आजपासून सुरू; फडणवीसांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शुभेच्छा

- Advertisement -

तुमचे देव दैवत आमचं काही बिघडवू शकत नाहीत

संभाजी राजे छत्रपती यांनी पोस्टमध्ये लिहिले की, परकीय सत्ताधीशांनी भारताच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरा व श्रद्धेय प्रतिकांवर घाला घातला. मंदिरे पाडली व दैवतांच्या मूर्त्यांची विटंबना केली. तुमचे देव दैवत आमचं काही बिघडवू शकत नाहीत, ही मानसिकता तयार करून हिंदुस्थानी प्रजेला गुलामगिरीत अडकवण्याची आणि त्यांच्यावर आपला धर्म लादण्याची ही खेळी होती. याला सर्वप्रथम छेद दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी ! देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी महाराजांनी लढा दिला. आपल्या पुत्राचे नाव “राम” ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे त्यांच्यावर जिजाऊ मासाहेबांनी केलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्याच आदर्श संस्कारांवर आधारीत होते, यास इतिहास प्रमाण आहे असे लिहिले आहे. तेव्हा छत्रपती संभाजी राजे यांचा रोख कुणाकडे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत.

आज श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने उज्ज्वल भारतीय संस्कृती व धर्माच्या महान तत्वांचे पूनर्प्रतिष्ठापन होईल, अशी आशा आपण बाळगू. या राममंदिर निर्माणासाठी लढलेल्या कारसेवकांपासून कालपर्यंत राबलेल्या कारागीरांपर्यंत सर्वांचे अनंत उपकार रामभक्तांवर आहेत. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! सर्व देशवासीयांना श्री रामप्रतिष्ठापना दिनी हार्दिक शुभेच्छा अशाही शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -