घरदेश-विदेशBharat Jodo Nyay Yatra : "भाजपाच्या सरकारी गुंडांकडून काँग्रेस यात्रेवर हल्ला", संजय...

Bharat Jodo Nyay Yatra : “भाजपाच्या सरकारी गुंडांकडून काँग्रेस यात्रेवर हल्ला”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

राजकीय इवेंटमध्ये भाजपाचा हात कोणी धरू शकणार नाही. त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर सोहळ्यावरून केली आहे.

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू आहे. ही यात्रा मणिपूरपासून सुरू झाली असून आता ही यात्रा आसाममध्ये पोहचली. यात्रा आसामध्ये पोहोचल्यानंतर भाजपाने राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला केला आहे, असा आरोप माजी मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रा’वर झालेल्या हल्ला हा भाजपाच्या सरकारी गुंडांनी हल्ला केला, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राजकीय इवेंटमध्ये भाजपाचा हात कोणी धरू शकणार नाही, अशी टीका संजय राऊता यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून केली आहे.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रा’च्या हल्लावर संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधीच्या भारत जोडो न्याया यात्रेवर भाजपाच्या सरकारी गुंडांनी हल्ला केला. या गुंडांनी राहुल गांधी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला झाला. ही लोकशाही नाही, एकाद्या पक्षाचा नेता लोकशाही वाचवण्यासाठी न्याया यात्रा काढला आहे. ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्या राज्यात अशा प्रकारचा हल्ला होत असेल, तर लोकशाही धोक्यात आहे. ही सरळ सरळ हुकूमशाही आहे. या घटनेचा शिवेसना ( ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे याचा निषेध करत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकशाही वाचवण्यासाठी नाशिकमध्ये महाअधिवेसनाचे आयोजन करण्यात आले आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Ram Mandir Inauguration : उत्सुकता शिगेला; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची लगबग सुरू

राजकीय इव्हेंट मध्ये भाजपाचा हात कोणी धरू शकणार नाही

राम मंदिर लोकर्पण सोहळ्यासंदर्भात संजय राऊत म्हणाले, “राम मंदिर लोकार्पण हा अभूतपूर्व असा सोहळा असणार आहे. पण याला राजकीय उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पण राजकीय इव्हेंटमध्ये भाजपाचा हात कोणी धरू शकणार नाही. त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम आहे. यातून भाजपाने 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. स्वातंत्रपणे राष्ट्रीय धार्मिक उत्सव असायला हवा होता. तसे न करता भाजपाने संपूर्ण सोहळा हा स्वत:चा खासगी सोहळा आहे आणि भाजपा ज्यांना लोक बोविले आहेत. तेच लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. त्या पद्धतीने भाजपाने कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आली आहे. देशातील चार प्रमुख शंकराचार्य पीठ आहेत. त्या शंकराचार्यंनी सोहळ्याला येण्यास नकार दिला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Ram Mandir : भाजपा आजही श्रीरामाचेच खातो, पण…, ठाकरे गटाची जहरी टीका

प्रभू श्री राम हे मतभेदाशिवाय विराजमान व्हावे

संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचा राम मंदिराच्या संपूर्ण संघर्ष आणि मंदिर निर्माणात फार मोठा वाटा होता. त्यामुळे राम मंदिर सोहळा हा कोणत्याही मतभेदाशिवाय व्हावा. प्रभू श्री राम हे त्यांच्या राम मंदिरात विराजमान व्हावे, ही आमची भूमिका आहे. प्रभू श्री राम हे देशाच्या कण-कणामध्ये आहेत. प्रभू श्री राम जेवढे अयोध्येचे आहे. तेवढेच ते पंचवटीचे देखील आहेत. प्रभू श्री रामांचा संघर्ष हा पंचवटीत केला आहे आणि राज्य अयोध्येत केले आहे. आमचा संबंध हा प्रभू श्री रामाच्या संघर्ष, त्याग आणि लढ्याशी आहे. त्यामुळे आम्ही अधिवेशनासाठी पंचवटीची निवड केली आहे आणि अयोध्येत लवकरच जाऊ”, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -