घरमहाराष्ट्रपुणेसनातनचा काहींकडून अपप्रचार केल्या जातोय; धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमातून फडणवीसांचा हल्लाबोल

सनातनचा काहींकडून अपप्रचार केल्या जातोय; धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमातून फडणवीसांचा हल्लाबोल

Subscribe

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या प्रकारे पंडित धीरेंद्र शास्त्री अविरत सनातनची सेवा करत आहेत आणि झोपलेल्या सनातनी लोकांना जागे करण्याचे काम करत आहेत, यामुळे संपूर्ण देश जागत आहे.

पुणे :  येथील संगमवाडीत पंडित धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांचा ‘श्री हनुमान कथा सत्संग’ व ‘दिव्य दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. या दिव्य दरबारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (22 नोव्हेंबर) हजेरी लावत सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. (Sanatan is being misrepresented by some Fadnavis uproar from Dhirendra Shastris program)

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या प्रकारे पंडित धीरेंद्र शास्त्री अविरत सनातनची सेवा करत आहेत आणि झोपलेल्या सनातनी लोकांना जागे करण्याचे काम करत आहेत, यामुळे संपूर्ण देश जागत आहे. एकूण भारत जागी झाला तर संपूर्ण जग जागी होईल आणि तीच गोष्ट आज आपल्या देशात बागेश्वर बाबांकडून होत आहे. सोबतच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 22 जानेवारी 2024 रोजी आणखी एक नवा इतिहास लिहल्या जाणार आहे. तो म्हणजे प्रभू श्रीरामांचे मंदिर त्याच ठिकाणी उभारले जात आहे की, ज्या ठिकाणी राम लल्लांचा जन्म झाला होता. बागेश्वर बाबा जेव्हा सनातनविषयी बोलतात तेव्हा काहींकडू अपप्राचार केल्या जातो. ते म्हणातात की, सनातन म्हणजे रूढीवाद, जातीवाद घेऊन मार्गक्रम करत आहे. पण ते सनातनचा अर्थ समजत नाहीत. सनातन म्हणजे अनादी काळापासून चालत आलेला विचार, तेव्हा जो अनंत आहे तोच सनातन आहे. जो सगळ्यांना बांधून ठेवतो, जो विचार सगळ्यांना जोडतो तोच विचार सनातनचा आहे. ज्यामध्ये ना उच आहे ना निच आहे. आपण सारे एक आहोत, एकाच इश्वराची लेकरं आहोत असे हा विचार सांगणारा धर्म म्हणजे सनातन. आणि त्याच धर्माचा विचार आज बागेश्वर बाबांच्या सांगण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. आणि पुण्यातील लोक खरोखर भाग्यवान आहेत की, त्यांना तीन दिवसीय श्रीराम प्रभू यांची कथा ऐकण्यास मिळाली, आणि बागेश्वर बाबांचा सानिध्यात राहण्याचे भाग्य प्राप्त झाले. आणि ज्यांना प्रभू श्रीरामांची कथा ऐकण्याचे भाग्य लाभते त्यांचे जीवन सफल होऊन जाते असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisement -

हेही वाचा : TELANGANA ELECTIONS 2023: अकबरुद्दीन ओवैसींनी मंचावरून पोलिसांना दिली धमकी

बागेश्वर बाबा जगदगुरू संत तुकाराम महाराज चरणी

बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांनी आज (22 नोव्हेंबर) देहूतील मंदिरात येऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबा यांनी यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती, यावरून वाद रंगला होता. मात्र आता त्यांना उपरती आली असून माझ्या वाचनात आल्याने मी संत तुकाराम यांच्याबाबत बोललो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच वारकरी संप्रदयाची त्यांनी हात जोडून माफी मागितली आहे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -