घरताज्या घडामोडीमशिदींवरचे ७० टक्के अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याचा माहितीचा स्त्रोत काय?, संदीप देशपांडेंचा...

मशिदींवरचे ७० टक्के अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याचा माहितीचा स्त्रोत काय?, संदीप देशपांडेंचा सवाल

Subscribe

राज्यात मशिदींवरील भोंगे हटविण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच आता भोंगा हा मराठी चित्रपट येत्या ३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. भोंगा आणि लाऊडस्पीकर हा विषय धर्माविरोधी नसून सामाजिक आहे, असं राज ठाकरे प्रत्येक वेळी सांगण्याचा प्रयत्न करताहेत. या सर्व विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. मशिदींवरचे ७० टक्के अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याचा माहितीचा स्त्रोत काय?, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

७० टक्के अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याचा माहितीचा स्त्रोत काय?

मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये संदीप देशपांडे हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी मशिदींवरचे ७० टक्के अनधिकृत भोंगे हे काढून टाकण्यात आले आहेत. तसेच काही लोकांनी परवानगी देखील मागितली आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संदीप देशपांडे म्हणाले की, मशिदींवरचे ७० टक्के अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याचा माहितीचा स्त्रोत काय आहे. एखादी माहिती अधिकृत आहे की अनधिकृत आहे, ही माहिती स्त्रोतवरून समजते. हा सूत्र नावाचा जो कोणी माणूस मिडियामध्ये वावरतोय. हा सूत्र कोण आहे? जो पर्यंत पोलिसांकडून अधिकृत माहिती जाहीर केली जात नाही. तोपर्यंत सूत्र या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा हा एक विषय आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.

- Advertisement -

राज ठाकरे आणि चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहीजे, असा आमचा प्रयत्न आहे, असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले.

भोंगा हा विषय धर्माविरोधी नसून सामाजिक

भोंगा हे नाव असून हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. काही राजकीय पक्षांकडून मुस्लिम समाजामध्ये एक चुकीचा संदेश दिला जातोय की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुस्लिम विरोधात विषय आहेत. खरे पाहता असं काहीच नाहीये. जेव्हा हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, हा विषय नक्की काय आहे. तसेच राज ठाकरेंचं यावर म्हणणं काय आहे. भोंगा हा विषय धर्माविरोधी नसून सामाजिक आहे, असं अमेय खोपकर म्हणाले.

- Advertisement -

हीच तारीख का निवडली?

प्रत्येक निर्मात्याची इच्छा असते की, माझा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित व्हावा. त्यामुळे ३ मे ही तारीख योग्य आहे, असं आम्हाला वाटलं. तसेच त्यादिवशी अक्षय्या तृतीया सुद्धा आहे. तसेच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचं निर्माता म्हणून या क्षेत्रात पदार्पण झालं आहे, असं अमेय खोपकर म्हणाले.

भोंगा आणि लाऊडस्पीकर हा विषय धर्माविरोधी नसून सामाजिक आहे, असं राज ठाकरे प्रत्येक वेळी सांगण्याचा प्रयत्न करताहेत. या सर्व विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. राज ठाकरे आणि चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहीजे, असा आमचा प्रयत्न आहे, असं खोपकर म्हणाले.


हेही वाचा : Nashik Mhada Scam: घोटाळ्यातील २०३१ घरं नाशिक म्हाडाला मिळाली, जितेंद्र आव्हाडांची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -