घरमहाराष्ट्रलाव रे तो व्हिडिओ विसरले का म्हणणाऱ्यांना राज ठाकरे आज उत्तर देतील...

लाव रे तो व्हिडिओ विसरले का म्हणणाऱ्यांना राज ठाकरे आज उत्तर देतील – संदीप देशपांडे

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा होणार आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणानंतर राज ठाकरेंवर जोरदार टीका झाली. राज ठाकरे हे भाजपची सी टीम असल्याची टीका होऊ लागली. अनेकांनी राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ विसरले का? असा सवाल केला. असा प्रश्न विचारणाऱ्यांना आज राज ठाकरे उत्तर सभेतून उत्तर देतील, असं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांची आजची ठाण्यातली सभा विरोधकांसाठी ही उत्तर सभा आहे. लाव रे तो व्हिडिओ राज ठाकरे विसरलेत का असे म्हणणाऱ्यांना आजच्या सभेत ना उतर मिळेल, असं देशपांडे म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचं लाव रे तो व्हिडिओ हा प्रचाराचा पॅटर्न लोकप्रिय झाला होता. त्यामुळे संदीप देशपांडे यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे ठाण्यातील उत्तर सभेतही पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ पुन्हा एकदा ऐकायला मिळणार अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -

राज ठाकरेंची आज सायंकाळी ६.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन सर्कल येथे जाहीर सभा होणार आहे. सभेच्या आधी दोन टीझरही मनसेकडून जाहीर करण्यात आले आहेत. आज होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अधिकारी आणि कर्मचारी मिळून ४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सभेचे रेकॉर्डिंग देखील पोलीस करणार आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -