घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: बायडेन यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी बूचा नरसंहारचा केला...

Russia Ukraine War: बायडेन यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी बूचा नरसंहारचा केला निषेध

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यामध्ये काल, सोमवारी व्हर्च्युअल बैठक झाली. दोन्ही देशांनी बैठकीत सर्वात जास्त रशिया आणि युक्रेन युद्धावर भर दिला. यादरम्यान भारताने युक्रेनमधील बुचा येथे झालेल्या नरसंहाराचा निषेध केला. बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धावर चिंता व्यक्त केली आणि हल्ले तात्काळ रोखण्याची विनंती केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन ट्वीट करून म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. भारत आणि अमेरिका संरक्षण आणि परस्पर भागीदारी वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे.

- Advertisement -

रशियाकडून केल्या जाणाऱ्या तेल खरेदीवर अमेरिकेचे मत

पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत रशियाकडून केल्या जाणाऱ्या तेल खरेदीवर चर्चा झाली. यादरम्यान अमेरिकेन रशियाकडून तेल खरेदीच्या भारताचा निर्णय नियमांचे उल्लंघन नाही, हे स्पष्ट केले. या युद्धादरम्यानच्या भारताच्या तटस्थ भूमिकेवरून अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच तेल खरेदीबाबत रशियापेक्षा अमेरिका कशी फायदेशीर आहे, हे समजावू लागले.

- Advertisement -

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी म्हणाले की, राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, आम्ही तुम्हाला तेल आयातीच्या साधनांमध्ये विविधता आणण्यासाठी मदत करू. रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीपेक्षा अमेरिकेकडून येणारे तेल जास्त महत्त्वपूर्ण आहे.

बूचा नरसंहार काय होता?

रशियन लष्करावर असा आरोप लावण्यात आला आहे की, त्यांनी राजधानी कीव जवळील बूचा शहरात सामूहिक हत्या केल्या आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला असे देखील म्हटले जातेय की, युक्रेनी लष्कराने बूचामध्ये अनेक निर्दोष लोकांचा जीव घेतला. सोशल मीडियावर बूचाचे बरेच फोटो व्हायरल होत झालेत. फोटोंमध्ये रस्त्यावर बरेच मृतदेह पडल्याचे दिसत आहे.


हेही वाचा – Ukraine Crisis: गहू, मका आणि खाद्य तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत वाढ


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -