घरमहाराष्ट्रतलवारीने केक कापणाऱ्या 'प्रिन्सदादा'ला अटक

तलवारीने केक कापणाऱ्या ‘प्रिन्सदादा’ला अटक

Subscribe

बेकायदा तलवार बाळगून वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या प्रिन्सदादाला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरुन पोलिसांनी प्रिन्सदादाला अखेर शोधून काढले

सैराट चित्रपटामध्ये प्रिन्सदादाने ज्यापध्दतीने तलावारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. तसाच वाढदिवस साजरा करण्याचा अनेकांनी प्रयत्न देखील केला. सांगलीच्या एकाला हाच प्रयत्न करणे महागात पडला आहे. इस्लामपूरमधील एका तरुणाने तलवारीने केक कापल्याने त्याला जेलमध्ये जावे लागले आहे.

तलवारीने कापला केक

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बेकायदा तलवार बाळगून त्याच तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तलवारीने केप कापतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर इस्लामपूर पोलिसांनी कारवाई करत बिलाल मुबारक मणेर या तरुणाला अटक केली. दोन दिवसापूर्नी बिलालचा वाढ दिवस होता. मित्रांसोबत चौकामध्ये त्याना वाढदिवस साजरा केला होता.

- Advertisement -

बिलालला पोलिसांनी केली अटक

बिलालने वाढदिवसाचा केक सुरीने न कापता. तलवारीने केक कापला. ऐवढेच नाही तर त्याने तलवार हातात घेऊन फोटो काढले आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. हे फोटो पाहिल्यानंतर पोलिसांनी बिलालचा शोध सुरु केला. त्यानंतर मंगळवारी रात्री त्याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. ऐवढेच नाही तर वाढदिवसाला त्याने हातात घेतलेली तलवार ही जप्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -