घरमहाराष्ट्रअजित पवारांनी गोपीनाथ मुंडेंवर लाठी हल्ला केला होता - संजय काकडे

अजित पवारांनी गोपीनाथ मुंडेंवर लाठी हल्ला केला होता – संजय काकडे

Subscribe

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.

अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर लाठी हल्ला केला होता, असा आरोप भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्यचे आरोप केले होते. याच आरोपांना प्रत्युत्तर देताना काकडेंनी पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.

नेमके काय म्हणाले संजय काकडे?

संजय काकडे पुण्यात प्रसारमाध्यामांना प्रतिक्रिया देताना बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. ‘अजित पवार यांनी अगोदर स्वत:च्या भूतकाळात डोकावून पाहावे. उलट अजित पवारांनीच सत्तेचा गैरवापर केला. सत्तेत असताना त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर एका आंदोलनादरम्यान लाठी हल्ला केला होता. त्याचबरोबर मावळमध्येही त्यांनी गोळीबार केला’, असे संजय काकडे म्हणाले. यापुढे ते म्हणाले की, ‘भाजपने कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. भाजपने कुणावरही हल्ला केलेला नाही.’ याशिवाय ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर पक्षातील नेत्यांना आयात करुनच वाढला आहे. राष्ट्रवादीने अनेकांची घरे फोडली’, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवारांचे विश्वासू; शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत प्रवेश करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -