घरताज्या घडामोडीSanjay Nirupam : 20 वर्षांनंतर मी घरवापसी करतोय; शिवसेनेतील प्रवेशाबाबत निरुपमांची प्रतिक्रिया

Sanjay Nirupam : 20 वर्षांनंतर मी घरवापसी करतोय; शिवसेनेतील प्रवेशाबाबत निरुपमांची प्रतिक्रिया

Subscribe

येत्या शुक्रवारी (3 मे) नुकताच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले. संजय निरुपम आज (1 मे) बाळासाहेब भवन येथे शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित होते.

मुंबई : येत्या शुक्रवारी (3 मे) नुकताच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले. संजय निरुपम आज (1 मे) बाळासाहेब भवन येथे शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक झाली. या बैठकीनंतर संजय निरुपम यांनी शिवसेनेतील पक्ष प्रवेशाबाबत माहिती दिली. (Sanjay Nirupam Will Join Shiv Sena At 3 May In Mumbai VVP96)

संजय निरुपम यांनी शिवसेनेच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनेत कधी प्रवेश करणार याबाबत माहिती दिली. त्यानुसार, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवल्यामुळे मी आज बाळासाहेब भवन येथे आलो होतो. आगामी काळात काय करायचं यासंदर्भात विस्तारीच चर्चा झाली. शुक्रवार 3 मे रोजी दुपारी 3 ते 4 वाजताच्या सुमारास मी माझ्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा कार्यक्रम ठेवला आहे”, असे संजय निरुपम म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : पालघर भाजपाकडे तर नाशिक राखण्यात शिंदेंच्या सेनेला यश; महायुतीचे जागावाटप अखेर निश्चित

“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रत्येक उमेदवार निवडणून येण्यासाठी जोरात प्रचार केला जात आहे. तसेच, शिवसेनेच्या ही सर्व जागा जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत”, असेही संजय निरुपम यावेळी म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला असता. उत्तर देताना निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य संजय निरुपम यांनी केले. “मी कुठे निवडणूक लढवतो आहे. कधी-कधी असं होतं. आपल्याला मनापासून वाटत असतं, पण तसं होत नाही”, असे उत्तर संजय निरुपम यांनी दिले.


हेही वाचा – मनसेसारखा आमचा बिनशर्त पाठिंबा नाही, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितले

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -