घरमहाराष्ट्रSanjay Raut : 'कोडगे लोक कधी राजीनामा देत नाहीत', संजय राऊत यांची...

Sanjay Raut : ‘कोडगे लोक कधी राजीनामा देत नाहीत’, संजय राऊत यांची एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका

Subscribe

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 होणार आहे. यासाठी सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. असा प्रश्न राऊत यांना दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला त्यावर संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंना ते निमंत्रण पाठवणार नाहीत, कारण आम्ही सर्व त्या राम मंदिराच्या अंदोलनात सहभागी होतो. संपूर्ण शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे त्यातले आरोपी अहोत. ज्यांनी राम मंदिरासाठी त्याग केला आहे. त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रण पाठवणार नाहीत. राम मंदिरासाठी त्याग केला त्यांना ते बोलावणार नाहीत ज्याचं योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : कुठल्याही सत्तापदाबाबद राहुल गांधी यांना अजिबात रस नाही, संजय राऊत यांच वक्तव्य

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजिनाम देणार असं सांगितलं जात आहे. यावर संजय रात्रत म्हणाले की, मला याची कल्पना नाही पण, कोडगी लोक राजिनाम देत नाहीत. हिटलरने राजीनामा दिला नव्हता, आत्महत्या केली होती, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. भाजपने लिहून दिलेलं भाषण एकनाथ शिंदेंनी सभागृहात वाचून दाखवलं आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं गेलं होतं. यामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या घोटाळ्याची चौकशी करा. चिमण आबा पाटील यांच्या मागणीनुसार चौकशी करा, मग मुंबई महापालिकेत या असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा… Ayodhya Ram Mandir : 1 किलो सोने आणि 7 किलो चांदीच्या श्रीरामाच्या पादुका, उद्घाटनाची जय्यत तयारी

- Advertisement -

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे काय बोलले मला माहित नाही. खोटारडे राजकारणी सत्तेवर बसले आहेत. त्यांनी सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली आहे. मी आतही नाव घेऊ शकतो. आपण कोणावर बोलतो याचं भान त्यांना नसेल. भाजपच भाषण ते वाचून दाखवत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.

आमचा सध्या सुरु असलेला लढा व्यक्ती विरुद्ध नाही. तर संविधान वाचवण्यासाठी आहे. संसदीय लोकप्रणाली, संसद वाचवण्यासाठी आमची लढाई आहे. जे लोक एका व्यक्तीच्या संरक्षणासाठी उभे आहेत. त्यांच्या अंतर आत्म्याला हे मान्य आहे का? हे विचारावं लागेल, असा थेट सवाल राऊतांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -