घरमहाराष्ट्रSanjay Raut: 'प्रभू श्रीरामा'लाच उमेदवारी देतो, इतकीच घोषणा भाजपकडून बाकी; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut: ‘प्रभू श्रीरामा’लाच उमेदवारी देतो, इतकीच घोषणा भाजपकडून बाकी; राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपकडून प्रभू श्रीरामालाच उमेदवारी द्यायची बाकी आहे. कारण, प्रभू श्रीरामाच्या मंदिरावरून त्यांनी खूप राजकारण केलं आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपावर टीका केली आहे.

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपकडून प्रभू श्रीरामालाच उमेदवारी द्यायची बाकी आहे. कारण, प्रभू श्रीरामाच्या मंदिरावरून त्यांनी खूप राजकारण केलं आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपावर टीका केली आहे. तसंच, यावेळी त्यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाबत मविआचा फॉर्म्युलाही सांगितला. (Sanjay Raut Prabhu Shri Rama is the only candidate this is the only announcement left by BJP Attack of the Sanjay Raut)

अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे उद्धाटन होणार असून भाजपाने यासाठी जोरदार तयारी केली आहे. आतापासूनच अयोध्येत तयारी सुरू झाली आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानक यांचे उद्घाटन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी उत्तर देताना, राऊतांनी भाजपाकडून प्रभू श्रीरामालाच आता निवडणुकीला उभे करण्याचे बाकी आहे. एवढे प्रभू रामाच्या नावावर राजकारण सुरू आहे, असा घणाघात केला.

- Advertisement -

जागावाटपाबाबत मोठं विधान

जागावाटपाबाबत बोलताना, संजय राऊत म्हणाले की, माझा वक्तव्यांचा विपर्यास केला गेला. मविआतील तिनही पक्षांत योग्य ताळमेळ आहे. आमच्यात मतभेद असल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यात काही तथ्य नाही. मविआत जागावाटपावरुन धुसफूस नाही. 48 जागांचं वाटप मेरिटनुसार होईल, असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेस शून्य आहे, असं मी कधीही म्हणालो नाही. काँग्रेसकडे आज एकही खासदार नाही, असे मला म्हणायचे होते. आमच्याकडे 18 खासदार होते, त्यातील काही गेले आणि सहा बाकी आहेत. राष्ट्रवादीकडे चार-पाच खासदार होते, त्यातील एक-दोन निघून गेले. पण काँग्रेसकडे आज एकही खासदार नाही. परंतु आम्ही एकत्र लढून महाराष्ट्रात जवळपास 40 जागा जिंकू शकतो, एवढी आमची ताकद आहे, अशी भूमिका राऊतांनी मांडली.

- Advertisement -

देशात स्वबळावर लढणारा एकही पक्ष नाही

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देताना, राऊत म्हणाले की, त्यांना काहीही बोलू द्या. पण आमच्याकडे आज सहा खासदार आहेत आणि आम्ही पूर्वीच्या आमच्या आकड्यावर पोहचू शकतो. आम्ही जिंकू शकत नाही, तर तुम्हीही जिंकू शकत नाही. आज देशात असा कोणताही पक्ष नाही, जो स्वबळावर जिंकू शकतो. भाजपालाही जिंकण्यासाठी ईव्हीएम हवे आहे. त्यांची आघाडी ईव्हीएमशी आहे. EVM शिवाय ते जिंकू शकत नाहीत, असा हल्लाबोल यावेळी राऊतांनी केला.

(हेही वाचा: Loksabha Election 2023: पुणे लोकसभेसाठी मनसेत चुरस; वसंत मोरेंची जोरदार लॉबिंग, नेमकं घडतंय काय?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -