घरताज्या घडामोडीराज्यपाल १२ आमदारांच संशोधन करतायत का?, संजय राऊतांचा सवाल

राज्यपाल १२ आमदारांच संशोधन करतायत का?, संजय राऊतांचा सवाल

Subscribe

गोवा आणि महाराष्ट्राला काही मदत नाही. इथल्या लोकांनी तडफडून मरायचे का?

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी १२ आमदारांच्या विधानपरिषदेवरील नियुक्त्यांबाबत कोणता एवढा संशोधन करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ तासात बालाकोट एअर स्ट्राईक केली होती. राज्यपाल असे कोणते संशोधन करत आहेत. पीएचडी करायची आहे का त्यावर? ती करुन घ्या जर १२ आमदारांचे सदस्यत्व रोखून ठेवणे अशा प्रकारे हा घटनेचा भंग आहे. जर कोणी वकील म्हणत असतील कायद्यामध्ये असे लिहिलेले नाही कुठे की राज्यपालांनी कोणत्याही कालमर्यादेत हे सदस्य नेमले पाहिजेत. तर त्यांना कायदा माहित नाही याचा अर्थ असाही नाही

की विधानपरिषदेमध्ये सदस्य तहयात नेमायचे नाहीत. यामध्ये राजकारण आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय आहे. संसदीय लोकशाहीचा सरळ सरळ अवमान आहे. आता अस कळत आहे की, राजभवनात त्या फाईलचा कुठे शोध लागत नाही आहे. ही भयंकर आणि गंभीर समस्या आहे. राजभवनात वादळ आले आणि फाईल वाहून गेली का? राजभवनावर भूत प्रेत येत-जात असतात. आजकाल तिकडे खुप लोक येतात त्यांनी चोरुन नेली ते बघितले पाहिजे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे नियमबाह्य आणि घटनाबाह्य काम करणं शोभा देत नाही. जर या १२ सदस्यांना नियुक्त करण्यात आले असते तर ते आमदार झाले असते. या संकटाच्या काळात त्यांनी झोकून काम केले असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या १२ आमदारांची मदत झाली असती. आता हायकोर्टाने राज्यपालांना प्रश्न केला आहे की, फाईल कुठे आहे? यावर आता राज्यपालांना उत्तर द्यावे लागेल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र गुजरातचे जुळं भावंड 

नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपेक्षा आहे. मुख्यमंत्री जनतेच्या आपेक्षांना खरे उतरतील पण या महाराष्ट्राला लुटण्याचे काम दिल्लीवाले करत असतात त्यांची काही जबाबदारी आहे की नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला जातात आणि एका झटक्यात १००० कोटी देतात बाजूला महाराष्ट्र गुजरातचे जुळे भावंडं आहे. गोवा जुळं भावंड महाराष्ट्राचे आहे. गोवा आणि महाराष्ट्राला काही मदत नाही. इथल्या लोकांनी तडफडून मरायचे का? तुम्हाला मजा वाटते एक प्रकारचे निघृण कृत्य आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राती नुकसानीसाठी मुख्यमंत्री मदत मागतील परंतु आताच्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष नसायला पाहिजे. चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आले गुजरातला मदत केली परंतु तुम्ही मराष्ट्राचे दुःख आणि वेदना समजू शकत नाही आहात. आम्हाला दरवेळी हात पसरायला लागतात हे सगळे राज्यातील जनता पाहत असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -