घरमहाराष्ट्रन काढलेल्या तिकिटाने वाचवले

न काढलेल्या तिकिटाने वाचवले

Subscribe

न काढलेल्या तिकिटामुळेच दैव बलवत्तर म्हणून अपघातातील अनेक प्रवासी बचावले, असे बसमधील जखमी प्रवाश्यांनी आपलं महानगरला सांगितले.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ठाणे-भिवंडी ही बस प्रवासी घेऊन जात असतांनाच दुसऱ्या थांबलेल्या रिकाम्या एसटी बसवर आदळून अपघात झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास सॅटिस पुलावर घडली. बसचा वेग कमी असल्याने वाहन चालकाला वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. या अपघातात बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमधील जखमी प्रवासी मच्छींद्र सकपाळ यांचे अनुभव

- Advertisement -

ठाणे- भिवंडी ही एसटी बस नेहमीच प्रवाशांनी भरगच्च भरलेली असते, मात्र अवघ्या २३ प्रवाशांना तिकीट दिल्यानंतर तिकीट मशीन बंद पडले. त्यामुळे अनेकांना तिकीटाची भाडे रक्कम नोंद असलेले तिकीट मिळाले नाही. त्यामुळे प्रवाशांना त्या बसमधून जाता आले नाही आणि बस प्रवाशांनी भरली नाही. त्यामुळे न काढलेल्या तिकिटामुळेच दैव बलवत्तर म्हणून अपघातातील अनेक प्रवासी बचावले, असे बसमधील जखमी प्रवासी मच्छींद्र सकपाळ यांनी आपलं महानगरला सांगितले.
भिवंडीत राहणारे मच्छीन्द्र हे आयटी क्षेत्रात नोकरीला आहेत. त्यांची लातूर येथे बदली झाल्याने बँकेत केवायसीसाठी ते भिवंडीला जात होते. विनावाहक बस असल्याने प्रवाशांनी तिकीट घेतले. माझ्या तिकिटावर पैसे छापून आले नाहीत. त्यामुळे तिकीट देणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तर मिळाले नाही. अखेर तिकीट मशीन बंद पडल्याने २३ प्रवाशांना तिकीट देऊन बस सोडण्यात आली. बसमध्ये साधारण ५८ ते ६० प्रवासी बसतात. अपघात झालेली बस प्रवाशांनी भरलेली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, उर्वरित प्रवाशांना तिकीट दिले नसल्याने ते बचावले असेच म्हणावे लागेल असे सकपाळ म्हणाले.

सुदैवाने चेंगराचेंगरी टळली
बस सुटली तेव्हा मी मोबाईलवर सिनेमा पाहत होतो, मात्र वाहन चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने आम्ही पुढच्या सीटवर आदळलो. काय झाले कळलेच नाही, क्षणभर वाटले पूल पडला की काय, मात्र बस दुसऱ्या बसला धडकल्याचे समजल्यावर प्रवासी घाबरून गेलेे. शांतता ठेवल्याने आणि घाबरून धावपळ न केल्यामुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली नाही.

- Advertisement -

संतोष गायकवाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -