घरमुंबईजुमल्यांचा जुलूम ! शेतकरी प्रश्नावरून शिवसेनेचा भाजपवर निशाणा

जुमल्यांचा जुलूम ! शेतकरी प्रश्नावरून शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Subscribe

जुमल्यांचा जुलूम या मथाळ्याखाली 'सामना'तून भाजवर टीका करण्यात आली. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद तर साधला पण तीच जुनी कॅसेट ऐकवल्याचे सामनातून म्हटले आहे. शिवाय शेतकऱ्यांना अच्छे दिन न आल्यास २०१९ साली सरकारला बळीराजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील दिला गेला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पुन्हा एकदा भाजपवर टीकेचे बाण चालवण्यात आले आहे. ‘जुमल्यांच्या जुलुम’अशा मथाळ्याखाली शेतकऱ्यांचे प्रश्न हातळण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या भेटीमध्ये शहा यांनी ‘सामना’तून होणाऱ्या टीकेवर नाराजी व्यक्त केली होती. पण, त्यानंतर देखील ‘सामना’तून भाजपला लक्ष्य करणे सुरूच आहे.

काय म्हटले आहे ‘सामना’मध्ये

विद्यमान राज्यकर्त्यांना ‘गरजते है वो बसरते नही’ म्हण लागू पडते. जुमलेबाजीचा देशातील जनतेला वीट आला असून यापूर्वीचे राज्यकर्ते आणि आताच्या राज्यकर्त्यांमध्ये फरक तो काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान काहीतरी नवीन ‘जुमला’ ऐकवतील अशी भाबडी आशा बाळगून शेतकरी टीव्हीसमोर बसले होते. मात्र, त्यांचा भ्रमनिराश झाला. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्तन्न दुप्पट करू असे आश्वासन पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दिले. त्यामध्ये नवीन ते काय? २०१४ साली देखील भाजपने अशाच प्रकारचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. याच आश्वासनावर विश्वास ठेवून काँग्रेस सरकारला शेतकऱ्यांनी नाकारले. पण, ४ वर्षानंतर देखील शेतकऱ्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ आले आहेत का? हे सांगणे पंतप्रधानांकडून अपेक्षित होते, पण, प्रत्यक्षात मात्र जुनीच ‘कॅसेट’ वाजवून पंतप्रधान मोकळे झाल्याची टीका ‘सामना’तून करण्यात आली. उत्पादन खर्चात कपात, शेतीमालाला रास्त भाव, मालाची नासाडी रोखणे आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध करून देणे या चारही पातळींवर सरकार अपयशी ठरल्याची टीका ‘सामाना’तून करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र दुप्पटीने वाढल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला गेला. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची संख्या जास्त असून आत्महत्या का वाढत आहेत? याचा विचार होणे गरजेचे असल्याचे ‘सामना’तून अधोरेखित करण्यात आले आहे. शिवाय ‘सरकार तेच तेच जुमले पुन्हा पुन्हा ऐकवत राहिले तर जुमल्यांच्या या जुमल्यांचा स्फोट २०१९ मध्ये होईलच’ अशा शब्दात सरकारला ‘इशारा’ दिला गेला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -